शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:12 IST

पती आणि सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे मानहानी आहेच, शिवाय...

चेन्नई: पती आणि सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे मानहानी आहेच, शिवाय ते मानसिक क्रौर्यही आहे, पतीच्या बाजूने घटस्फोटाचा निर्णय देताना, मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच हे निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती जे. निशा बानू आणि न्यायमूर्ती आर. शक्तीवेल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. घटस्फोटाची याचिका फेटाळावी आणि वैवाहिक हक्क परत मिळावे याबद्दल पत्नीने याचिका केली होती. त्याला कौटुंबिक न्यायालयाने मान्यता दिली होती. त्या  आदेशाविरुद्ध पतीने दाखल केलेल्या अपिलावर खंडपीठ सुनावणी करत होते. या जोडप्याने २०१५ मध्ये लग्न केले आणि २०१६ मध्ये त्यांना मुलगा झाला. पत्नीने पतीच्या व त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंड्याचा खटला दाखल केला होता. 

पतीचे आरोप काय? पतीचा घटस्फोटाचा खटला दाखल करताना आरोप केले होते की, त्याची पत्नी खूप भांडखोर होती. तिला पालकांबरोबर राहायचे नसल्याने त्यांचा सतत अपमान करायची.त्याला आणि त्याच्या पालकांना शिवीगाळ करत होती. पत्नीच्या संशयी स्वभावामुळे आणि सततच आत्महत्या करण्याच्या धमक्यांमुळे पतीला अभियांत्रिकी महाविद्यालयातील नोकरी सोडावी लागली, असेही पतीने म्हटले आहे. 

पत्नीचे आरोप काय? घटस्फोटाचा खटला प्रलंबित असताना, पत्नीने पतीच्या आणि त्याच्या वडिलांविरुद्ध अपमानास्पद आणि बदनामीकारक टिप्पण्यांसह खोटी तक्रार दाखल केली.सासरे आपला लैंगिक छळ करत होते. तसेच पती इतर मुलींशी छेडछाड करत होता. तसेच तो अनेक मुलींशी शारीरिक संबंध ठेवत होता, असा पत्नीचा आरोप होता. तसेच आपला हुंड्यासाठीही छळ करण्यात आला असा आरोप पत्नीने तिच्या तक्रारीत केला आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhusband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालय