शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh: सुशासनाचे मुद्दे मांडणारा मध्य प्रदेशचा पहिला सुशासन अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 06:31 IST

Madhya Pradesh: मध्य प्रदेशच्या पहिल्या सुशासन अहवालात नागरी विकास, उद्योग, सार्वजनिक आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण उणिवांकडे लक्ष वेधत मध्य प्रदेशात सुशासनला चालना देण्यासाठी दीर्घावधीच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत.

- अभिलाष खांडेकरभोपाळ : मध्य प्रदेशच्या पहिल्या सुशासन अहवालात नागरी विकास, उद्योग, सार्वजनिक आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण उणिवांकडे लक्ष वेधत मध्य प्रदेशात सुशासनला चालना देण्यासाठी दीर्घावधीच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. सोमवारी नवी दिल्लीत हा ३६० पान सुशासन अहवाल जारी करण्यात आला.या अहवालात शिवराज सिंह चौहान सरकारच्या १७ वर्षातील सुशासनासंबंधी करण्यात आलेल्या उपाय-योजनांबाबत भाष्य करण्यात आले असून राज्याच्या विकासाला गती देण्यासंबंधी अनेक शिफारशीही करण्यात आल्या आहेत.अटल बिहारी वाजपेयी सुशासन आणि धोरण विश्लेषण संस्थेच्या (एआयजीजीपीए) वतीने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ही संस्था मध्य प्रदेशच्या नियोजन आयोगासारखे काम करते. सुशासन अहवाल जारी करणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य आहे. सरकारी ते नागरी सेवा अद्ययावत करणे जरुरी आहे. कृषी क्षेत्राबाबत अहवालात असे निरीक्षण नोंदवित आले आहे की, राज्याने व्यवसाय सुलभीकरण पूरक धोरणांवर भर द्यायला पाहिजे. तसेच व्यापार आणि शेतीशी संबंधित वाद वेगाने निकाली काढले पाहिजे, असे अहवालात म्हटले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले की, मध्य प्रदेश एकेकाळी बीमारु राज्य होते; परंतु, आज ही ओळख पुसून राज्याने सुशासनासंबंधी अनेक मापदंड स्थापन केले आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, डाॅ. जितेंद्र सिंह आणि फगन सिंह कुलस्ते आदी मान्यवर उपस्थित होते. एआयजीजीपीएचे चेअरमन प्रो. सचिन चतुर्वेदी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, समाधान ऑनलाइन, सीएम जनसेवा, सार्वजनिक सेवा अधिनियम आदी योजनामुळे सुशासनात मध्य प्रदेशची चांगली कामगिरी आहे. तथापि, लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी सुधारणा करणे जरुरी आहे. सर्वांगीण विकासासाठी सुशासनाच्या सर्वोत्तम पद्धतीचे दस्तावेजीकरण करणे, हे आमचे उद्दिष्ट होते.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेश