शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

प्रेयसीची हत्या करुन ६ महिने फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह; नव्या भाडेकरुने लाईट बंद करताच प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:00 IST

मध्य प्रदेशात एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह सहा महिने फ्रिजमध्ये ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

Madhya Pradesh Crime: लिव्ह-इन रिलेशनशिपमधून आणखी एक भयानक हत्याकांड समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील देवास येथील वृंदावन धाम कॉलनीतील एका घरात फ्रिजमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने घरातून उग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. घटनेची माहिती मिळताच  पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. गेल्या सहा महिन्यांपासून महिलेचा मृतदेह हा फ्रिजमध्ये बंद होता अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे.

शेजाऱ्यांना कल्पनाच नाही

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखेच आणखी एक प्रकरण मध्य प्रदेशातील देवासमध्ये समोर आले आहे. सहा महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. फ्रिजचा वीजपुरवठा खंडित झाल्याने खोलीतून दुर्गंधी आल्यानंतर हा खून उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या विवाहित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मृतदेह ज्या खोलीत ठेवण्यात आला होता, त्या खोलीच्या शेजारीच दुसऱ्या भाडेकरूचे कुटुंब राहत होते, मात्र आजतागायत कोणालाही याची कल्पना नव्हती.

२०२३ मध्ये घेतलं होतं घर भाड्याने

पिंकी उर्फ ​​प्रतिभा प्रजापती असे पीडितेचे नाव आहे. तर संजय पाटीदार असे आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा आहे. उद्योगपती धीरेंद्र श्रीवास्तव यांचे देवास येथील वृंदावन धाम येथे दोन मजली घर आहे. ते सहा महिन्यांपासून दुबईत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जुलैमध्ये बलवीर राजपूत नावाच्या व्यक्तीने तळमजला भाड्याने घेतला होता. परंतु जुन्या भाडेकरूने कुलूप लावलेल्या दोन खोल्या त्याला वापरता आल्या नाहीत. धीरेंद्र श्रीवास्तव यांनी जुलै २०२३ मध्ये संजय पाटीदार याला हे घर भाड्याने दिले होते. संजयने जून २०२४ मध्ये घर सोडले होते.

नव्या भाडेकरुमुळे हत्येची घटना उघड

संजय पाटीदारने जूनमध्येच फ्लॅट रिकामा केला होता, मात्र त्याने फ्रीजसह काही वस्तू दोन खोल्यांमध्ये बंद करून ठेवल्या होत्या. आपण लवकरच आपले सामान परत घेण्यासाठी येऊ, असं तो श्रीवास्तव यांना वारंवार सांगत होता. बलवीरला त्या खोल्यांची गरज होती म्हणून त्याने घरमालकाशी बोलणं केलं. घरमालकाने कुलूप तोडून खोली वापरण्यास सांगितले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी बलवीरने कुलूप तोडले असता फ्रीज सुरू असल्याचे त्याला आढळून आले. जुन्या भाडेकरूने चुकून फ्रीज चालू ठेवला होता, असं त्याला वाटलं म्हणून त्याने तो बंद केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेल्या वस्तू काढू असा विचार बलवीरने खोली बंद केली.

मात्र शुक्रवारी सकाळी खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. काही लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून फ्रीज उघडले असता त्यांना कुजलेला मृतदेह आढळून आला. पिंकीचा मृतदेह चादरीत गुंडाळलेला होता. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता संजय पाटीदारचे नाव पुढे आले. मार्च  २०२४ मध्ये पिकींला शेवटचे पाहिले होते, असं शेजाऱ्यांनी सांगितले. शेजाऱ्यांनी विचारले असता पिंकी तिच्या माहेरी गेल्याचे संजयने सांगितले होते.

संजय पाटीदार प्रतिभासोबत पाच वर्षे लिव्ह-इनमध्ये होता. तो उज्जैनमध्ये तीन वर्षे राहिला. पाटीदार विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. मात्र प्रतिभा त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. "हत्येच्या दिवशी मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण प्रतिभाने ऐकलं नाही. तेव्हा तिचा गळा दाबून खून केला. मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला आणि हाय स्पीड मोड चालू केला," असं पाटीदारने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस