शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पतीनं ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास दिला नकार, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; रूममध्ये डोकावून पाहिलं तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 11:36 IST

ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथील एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

आपण पाहतो की, महिला आणि पुरुष दोघेही मेकअप करण्यासाठी  ब्युटी सलूनमध्ये जात असतात आणि त्यांचा आवडता मेकअप करत असतात. मात्र मध्य प्रदेशातील इंदूरमधून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीला ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी नकार दिल्याने ती संतापली. तिला एवढा राग आला की, तिने आत्महत्याच केली.

ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथील एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील रहिवासी बलराम यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. बलराम आणि त्यांची पत्नी रीना यांच्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत. बलराम टेलरिंग काम करतात. त्यांच्या पत्नीला ब्युटी पार्लरमध्ये जायचे होते. मात्र, काही कारणास्तव, त्यानी तिला ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास नकार दिला होता. यामुळे त्याची पत्नी संतापली आणि तिने रागाच्या भरात गळफास घेतला.

बलराम यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी त्याच्यासोबत भांडत होती. मात्र बलराम यांनी ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी नकार दिल्याने तिने गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर घटनेचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांना शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलराम आणि त्याची पत्नी रीना या दोघांमध्ये नेहमीच भांडणं होत होते. गुरुवारी त्याने पार्लरमध्ये जाण्यास नकार दिल्याने रीना संतापाच्या भारत खोलीत गेली आणि आतून दरवाजा लावून घेतला.

बराच वेळ दरवाजा न उघडल्याने बलराम यांनी आत डोकावून पाहिले तर त्यांना धक्काच बसला. त्यांना पत्नी फासावर लटकलेली दिसली. यानंतर त्यांनी दरवाजा तोडून तिला खाली उतरवले. तोवर सर्वकाही संपले होते. तपास अधिकाऱ्यानी म्हटले आहे, पती आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून बलराम यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार