शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मॉब लिन्चिंग रोखण्यासाठी 'हे' राज्य कायदा करणार; 5 वर्षांचा तुरुंगवास घडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 08:40 IST

जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी कठोर कायदा

भोपाळ: देशभरात जमावाकडून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण वाढत आहे. जमावाकडून कायदा हाती घेतला जात असल्यानं सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे. अशा घटना टाळण्यासाठी मध्य प्रदेश सरकार कठोर कायदा करणार आहे. कथित गोरक्षकांकडून करण्यात येणाऱ्या हत्या रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकार विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कायदा मंजूर करणार आहे. सध्या मध्य प्रदेशात गोवंश हत्या, गोमांस बाळगण्यास बंदी आहे. याशिवाय गोवंशाची वाहतूक करण्यावरही बंदी आहे. मात्र या कायद्यात गोसंरक्षणावरुन होणाऱ्या हिंसेचा किंवा जमावाकडून होणाऱ्या हत्येचा उल्लेख नाही. त्यामुळेच या कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार घडवल्यास, मॉब लिन्चिंग झाल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.सप्टेंबर 2015 मध्ये उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये अखलाक नावाच्या व्यक्तीची कथित गोरक्षकांनी हत्या केली होती. अखलाक यांच्या घरात गोमांस असल्याच्या संशयावरुन जमावानं त्यांना जबर मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कथित गोरक्षकांनी अनेकांना मारहाण केली. गोमांस बाळगल्याचा, गोहत्या केल्याचा, गोमांसाची वाहतूक केल्याच्या संशयावरुन जमावानं कायदा हातात घेतल्याचे प्रकार अनेकदा घडले.  

टॅग्स :LynchingलीचिंगMadhya Pradeshमध्य प्रदेश