शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश पोलिसांची कारवाई, दुर्मिळ इजिप्शियन गिधाडांची तस्करी करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 08:49 IST

सुलतानपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये प्रवाशांना दुर्गंध आणि पक्ष्यांच्या आवाज आल्यानंतर त्यांनी तक्रार केली.

भोपाळ:मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात दुर्मिळ गिधाड तस्करीच्या एका आंतरराज्यीय रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यासोबतच पोलिसांनी उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून एका 60 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. कानपूरवरुन महाराष्ट्रातील मालेगाव येथे सात दुर्मिळ इजिप्शियन गिधाडांची तस्करी केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुलतानपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीच्या स्लीपर कोचमधील प्रवाशांनी दुर्गंधी आणि पक्ष्यांच्या आवाजाची तक्रार केली, त्यानंतर अधिकाऱ्यांही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि राज्य वन विभागाच्या संयुक्त पथकाने रेल्वे कोचची नाकाबंदी करुन झडती घेतली. त्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गिधाडे आढळून आली. खंडवा वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी अनिल शुक्ला यांनी माध्यमांना सांगितले की, खंडवा आरपीएफकडून आम्हाला फोन आला की एक व्यक्ती इजिप्शियन गिधाडांची तस्करी करत आहे. आम्ही लगेच तिथे पोहोचलो. वनविभाग आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने रेल्वेवर छापा टाकून फरीद शेख याला अटक केली. त्याच्याकडून सात इजिप्शियन गिधाडे मिळाली आहेत.

आरोपी अटकेततस्कर फरीद शेख याने चौकशीदरम्यान सांगितले की, ही गिधाडे त्याला कानपूर स्थानकावर समीर खानने दिली होती. तो कानपूरचा रहिवासी आहे. खानने गिधाडांना मालेगावला घेऊन जाण्यास सांगितले होते. समीर खान याने शेखला गिधाड घेण्यासाठी 10 हजार रुपये देण्यास सांगितले होते. याप्रकरणी आरोपीविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या सर्व गिधाडे वनविभागाच्या ताब्यात आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSmugglingतस्करीPoliceपोलिस