शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अनोखी निवडणूक; सरपंच पदाचा लिलाव, 44 लाखांची बोली लावणारा झाला गावचा सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 14:30 IST

या बोलीत लावलेले पैसे गावाच्या विकासासाठी वापरले जाणार आहेत.

भोपाळ: सध्या सर्वत्र निवडणुकांचे वातावरण आहे. पुढील वर्षात अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. पण, सध्या मध्य प्रदेशातील एका निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशातील एका गावामध्ये पंचायत सदस्यांनी सरपंच निवडण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली.

सरपंच पदासाठी लिलावमिळालेल्या माहितीनुसार, पंचायतीमधील सदस्यांनी सरपंच पदासाठी मतदान न घेता चक्क लिलाव ठेवला. सरपंच पदासाठी चार जणांनी बोली लावली होती. यामागे गावकऱ्यांचा तर्क असा आहे की, उमेदवार जिंकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने पैशांचा वापर करतो. पण, लिलावत असे करू शकणार नाही, शिवाय बोलीतून मिळालेल्या पैशातून गावाचा विकास होईल. तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा आणि तणावही राहणार नाही. ही अनोखी निवडणूक मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील भटौली ग्रामपंचायतीमध्ये झाली आहे. 

44 लाखांची सर्वोच्च बोलीउमेदवारांच्या निवडीसाठी 21 लाख रुपयांपासून बोलीला सुरुवात झाली होती. एक-एक करत उमेदवार बोली लावत होते, पण अखेर 44 लाखांच्या बोलीवर सरपंच पद फायनल झाले. सौभागसिंग यादव 44 लाखांची बोली लावणाऱ्या नवनियुक्त सरपंचाचे नाव आहे. हा लिलाव झाला असला तरी, नियमाप्रमाणे गावात निवडणूक होणारच आहे. 

उमेदवारी अर्ज भरण्यासह योग्य निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याचे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण, आता या निवडणूक प्रक्रियेत फक्त सौभागसिंग यादव अर्ज दाखल करले, त्याच्याविरोधात गावातील इरर कुणीही अर्ज दाखल करणार नाही, अशी माहिती गावातील लोकांनी दिली आहे. म्हणजेच आता सौभागसिंगचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकsarpanchसरपंच