शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

माझं काम झालं... ठरल्याप्रमाणे चप्पल पाडली अन् बाईक थांबवून पतीला संपवलं, पत्नीनेच केला पहिला वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:30 IST

अल्पवयीन पत्नीने प्रियकारसह मिळून पतीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली.

MP Crime: मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील इंदूर-इच्छावर महामार्गावरील आयटीआय कॉलेजजवळील शेतात रविवारी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.  मृतदेहाजवळील शेतात काही अंतरावर तरुणाची दुचाकीही सापडली. शनिवारी तरुण त्याच्या पत्नीसह घरातून निघाला होता. मात्र शेतात तरुणाचा मृतदेह सापडला आणि पत्नी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांचा पत्नीवर संशय बळावला आणि धक्कादायक सत्य समोर आले. अल्पवयीन पत्नीने ३६ वेळा भोकसून पतीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे हा सगळा प्रकार तिने व्हिडीओ कॉल करुन प्रियकराला दाखवला होता.

१३ एप्रिल रोजी इंदूर-इच्छापूर महामार्गावरील बुरहानपूर आयटीआय कॉलेजजवळील झुडपात राहुल पांडे उर्फ गोल्डन या तरुणाचा मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान, या हत्येची खरी सूत्रधार राहुलची अल्पवयीन पत्नी असल्याचे निष्पन्न झाले.  राहुलच्या पत्नीने प्रियकरासह तिच्या पतीला मारण्याचा कट रचला होता. प्रियकराच्या दोन मित्रांच्या मदतीने पत्नीने राहुल पांडेची हत्या केली. यानंतर तिने प्रियकराला व्हिडिओ कॉल केला आणि त्याला तिच्या पतीचा मृतदेह दाखवला. एवढेच नाही तर जानू माझे काम झाले आहे, असेही तिने म्हटलं.

प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर समोर आला प्लॅन

२५ वर्षीय राहुलची त्याच्या १७ वर्षीय पत्नी आणि प्रियकराच्या दोन मित्रांनी तुटलेल्या बिअरच्या बाटलीने वार करून हत्या केली. त्यानंतर तिघेही पळून गेले. राहुलवर ३६ वेळा वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. राहुलची पत्नी या घटनेपासून फरार होती. राहुल १२ एप्रिल रोजी पत्नीसह घराबाहेर पडला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह सापडला. राहुलच्या पत्नीचे युवराजशी प्रेमसंबंध असल्याचेही समोर आले. मग पोलिसांना संशय आला आणि त्यांनी या दिशेने तपास केला. युवराजला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या प्रेयसीसोबत राहुलच्या हत्येची योजना आखल्याची कबुली दिली. 

पहिला वार पत्नीनेच केला

१२ एप्रिलच्या रात्री ८:०० ते ८:३० च्या दरम्यान, अल्पवयीन मुलीने युवराजला राहुलचा रक्ताने माखलेला मृतदेह दाखवण्यासाठी व्हिडिओ कॉल केला आणि काम पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिघेही तिथून पळून गेले. त्यानंतर राहुलच्या पत्नीसह तिघांना पोलिसांनी सानवेर येथून ताब्यात घेतले. चौकशीत तिने राहुलला खरेदीच्या बहाण्याने बाहेर नेले होते. बाजारातून परतल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवले. मागून दोन्ही आरोपी त्यांच्यामागे येत होते. ठरल्याप्रमाणे राहुलच्या पत्नीने मुद्दाम आयटीआय कॉलेजसमोरील स्पीड ब्रेकरजवळ तिची चप्पल खाली टाकली आणि त्याला थांबण्यास सांगितले. गाडी थांबताच, दोघांनीही राहुलला झुडपात ओढत नेले आणि त्याच्यावर हल्ला केला. पहिला वार राहुलच्या पत्नीनेच केला ज्यामुळे तो बेशुद्ध झाला.

त्यानंतर एका आरोपीने दुसऱ्या बाटलीने वार केले तर तिसऱ्या आरोपीने राहुलवर धारदार शस्त्राने वार केले. ज्यामुळ राहुल पांडेचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर, तिन्ही आरोपी रावेर रेल्वे स्थानकावर गेले आणि इटारसीला जाण्यासाठी ट्रेनने उज्जैनला गेले. संपूर्ण गुन्ह्यात, चारही आरोपी फोनवर एकमेकांच्या संपर्कात होते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस