शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! पन्नास वर्षांनंतर भारतात चित्त्याचा जन्म; PM मोदींनी शेअर केला व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 18:42 IST

कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आलेल्या सियाने 4 पिलांना जन्म दिला आहे. भारतात चित्ता परतला, ही देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

Kuno National Park : भारताच्या जंगलात एकेकाळी चित्त्यांची मोठी संख्या होती. पण, शिकारीमुळे भारतातील सर्व चित्ते मरण पावले. यानंतर आता पाच दशकांनंतर पहिल्यांदाच भारतात चित्त्याचा जन्म झाला आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या मादी चित्ता सियाने बुधवारी 4 पिलांना जन्म दिला. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. सियायाच्या गरोदर असल्याची माहिती कुनो नॅशनल पार्कच्या व्यवस्थापनाला 20 दिवसांपूर्वी मिळाली होती. तेव्हापासून तिच्यावर विशेष उपचार सुरू होते. मादी चित्ता साशा हिचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे या पिलांचा जन्म महत्वाचा मानला जात आहे.

पीएम मोदींनी वनमंत्र्यांचा व्हिडिओ रिट्विट केला:- 

नामिबियातून आणल्यानंतर 50 दिवस या चित्त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यानंतर गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो येथे नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांना सोडले होते. त्यानंतर यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांची दुसरी तुकडी कुनो येथे आणण्यात आली. भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत दरवर्षी किमान बारा चित्ते भारतात आणले जाणार आहेत. हे चित्ते भारतातील विविध राष्ट्रीय उद्यानांमध्ये सोडण्यात येतील.

चित्ताचा गर्भधारणा कालावधी 90 दिवसांचा मुख्य वनसंरक्षक जे.एस. चौहान यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही सियाच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. ती पिलांना जन्म देणार याची आम्हाला जाणीव झाली होती. बुधवारी ती शिकार करायला गेली असता, नामिबियातून आलेले चित्ता तज्ज्ञ इलाई वॉकर यांनी तिला पिलांना जन्म देताना पाहिले. कुनोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सियाने नामिबियातून पहिल्या तुकडीत आलेल्या एल्टन किंवा फ्रेडीसोबत मेटींग केली आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी