शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

IMAच्या वार्षिक बैठकीत मोठा राडा; डॉक्टरांनी एकमेकांना तुडवं तुडवं तुडवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 17:22 IST

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बैठकीत डॉक्टरांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली.

Jabalpur IMA Meeting Fight Video: लोकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांना देवाची उपमा दिली जाते. पण, जेव्हा हेच डॉक्टर टपोरी पोरांसारखे एकमेकांवर तुटून पडतात तेव्हा काय होईल...अशीच घटना मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये घडली आहे. आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनची (Indian Medical Association) वार्षिक बैठक सुरू होती. या बैठकीत मोठ-मोठे डॉक्टर आले होते. पण, या बैठकीचे रुपांतर आखाड्यात झाले आणि डॉक्टरांनी एकमेकांना अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी तुडवलं. 

IMAचा व्हिडिओ व्हायरलइंडियन मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक सभेत गाव गुंडांप्रमाणे सुक्षित डॉक्टर एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत होते. या संपूर्ण मारहाणीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाषण सुरू असतानाच डॉक्टरांमध्ये वाद पेटला आणि वादाचे रुपांतर हाणामारी झाले. यावेळी काही डॉक्टरांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्नही केला.

वाद कशामुळे पेटला?मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्यक्रमाची सुरुवात आयएमएचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमरेंद्र पांडे यांनी केली. यावेळी त्यांनी भोपाळ, उज्जैन, इंदूर आणि ग्वाल्हेरच्या IMA सदस्यांवर टीका केली. या टीकेचा ग्वाल्हेर IMA सदस्यांनी विरोध केला. यावेळी डॉक्टर पांडेने मंचावरुन ग्वाल्हेरच्या सदस्यांना बाहेर काढण्याची मागणी केली. यामुळे वाद आणखी चिघळला आणि त्यांनी पांडेंना मंचावरुन धक्का दिला. यावेळी काही डॉक्टरांनी त्यांना मारहाण केली.

डॉक्टरांच्या मध्यस्थीने वाद मिटलाहाणामारी वाढत असल्याचे पाहून घटनास्थळी उपस्थित अधिकारी व इतर डॉक्टरांना मदतीला यावे लागले. बराच वेळ हा वाद सुरू होता. त्यानंतर डॉ.अमरेंद्र पांडे यांनी माफी मागितल्यानंतरच संपूर्ण वाद मिटला. आयएमएचे सदस्य राकेश पाठक यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध केला असून, प्रकरणाची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी