शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर मित्र किंवा मैत्रिणीसोबत अश्लील संवाद साधताय?; हायकोर्टानं निकालात म्हटलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:07 IST

या प्रकरणात हायकोर्टाने पतीला घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. 

मध्य प्रदेश कोर्टानं अलीकडेच कौटुंबिक न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात अर्ज करणाऱ्या महिलेची याचिका फेटाळून लावली आहे. या महिलेने तिच्या पतीवर मारहाणीचा आणि २५  लाखांचा हुंडा मागितल्याचा आरोप केला होता तर पतीने पत्नी तिच्या मोबाईलवरून पुरूष मित्रांशी अश्लील संवाद साधते असा आरोप केला होता. पत्नी तिच्या पुरूष मित्रांना खासगी जीवनाबद्दल सांगते. पती-पत्नी यांच्यातील शारीरिक संबंधांबाबत मित्रांशी फोनवर चॅटिंग करत असते असं पतीने म्हटलं. या प्रकरणी सुनावणीनंतर मध्य प्रदेश हायकोर्टाने निकाल सुनावला आहे.

हायकोर्टाने म्हटलं की, कुणीही पत्नी किंवा पती लग्नानंतर मित्रांशी अश्लील संवाद साधू शकत नाही. कुठल्याही पतीला त्याची पत्नी मोबाईलवरून अशाप्रकारचे अश्लील चॅटिंग करेल हे सहन होणार नाही. लग्नानंतर पती आणि पत्नी यांना त्यांच्या फोनवरून कुणाशीही बोलण्याचा, चॅटिंग करण्याचा अधिकार आहे परंतु आपण काय बोलतोय याचे भान ठेवणे गरजेचे आहे असं कोर्टाने सांगितले.

तसेच तुमच्या बोलण्यात सभ्यता असली पाहिजे. जेव्हा तुम्ही महिला असून एखाद्या पुरुषाशी बोलता तेव्हा आणखी जास्त काळजी घेतली पाहिजे. तुमचं बोलणं असे असले पाहिजे जेणेकरून त्याचा पार्टनरला आक्षेप असायला नको. जर आक्षेपानंतरही पती अथवा पत्नी असं बोलणे सुरूच ठेवत असेल तर हे निश्चितपणे दुसऱ्या पार्टनरसोबत मानसिक छळाचं कारण होऊ शकतं असं हायकोर्टाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?

या जोडप्याचे २०१८ साली लग्न झालं होते. पतीला ऐकायला थोडं कमी येते याची माहिती लग्नाआधीच पत्नीला दिली होती. लग्नानंतर पत्नीने आईसोबत क्रूर छळ केला असा आरोप पतीने केला. दीड महिन्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली. लग्नानंतरही पत्नी तिच्या आधीच्या प्रियकरासोबत मोबाईलवर चॅटिंग करायची. त्या दोघांचं बोलणं खूप अश्लील होते असं पतीने म्हटलं. तर पत्नीने आरोपांचा बचाव करत ज्या पुरुषांशी चॅटिंग होते, त्याचा काही संबंध नाही. पतीने माझा मोबाईल हॅक केला होता आणि त्यातून पुरावा म्हणून २ पुरुषांना मेसेज केल्याचा पत्नीने दावा केला.

पत्नीने काय केला बचाव?

पतीने फोनवरील चॅट बाहेर काढणे हे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासारखं आहे. पती मला मारहाण करत २५ लाखांचा हुंडा मागत असे असं पत्नीने म्हटलं. मात्र हायकोर्टाच्या सुनावणीत महिलेच्या वडिलांनीच मुलीला मुलांसोबत बोलण्याची सवय असल्याचं मान्य केल्याचं समोर आले. या प्रकरणात हायकोर्टाने पतीला घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDivorceघटस्फोट