शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विजयात अडसर, संधीच्या शोधात भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 11:13 IST

मध्य प्रदेशमधून भाजपाची सत्ता गेली असली तरी भाजपाला पुन्हा सरकार स्थापण्याचं स्वप्न पडू लागलं आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 114, तर भाजपाला 109 जागांवर विजय मिळालाया निवडणुकीत सपा आणि बसपासह अपक्ष निर्णायक भूमिका बजावणारमध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे.

भोपाळ- मध्य प्रदेशमधून भाजपाची सत्ता गेली असली तरी भाजपाला पुन्हा सरकार स्थापण्याचं स्वप्न पडू लागलं आहे.  जवळपास 23 तास सुरू असलेली मतमोजणी संपली असून, काँग्रेसला 114, तर भाजपाला 109 जागांवर विजय मिळाला आहे. सपा 1, बसपा 2 आणि अपक्षांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत सपा आणि बसपासह अपक्ष निर्णायक भूमिका बजावणार आहेत. मध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. भाजपा किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांची सत्ता स्थापनेसाठी अपक्षांवर मदार असणार आहे.काँग्रेसला बहुमतासाठी फक्त 2 जागांची गरज असून, मायावती काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. तर भाजपाला सत्तास्थापनेसाठी आणखी सात जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे अपक्ष, बसपा आणि सपा या पक्षांच्या आमदारांना या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावण्याची संधी आहे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान आणि अमित शाह मध्य प्रदेशमध्ये संख्याबळाची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा आहे. 

मध्य प्रदेश निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदावर दावा करत आले आहेत. कमलनाथ यांच्याकडे काँग्रेस नेतृत्व मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्याची जास्त शक्यता आहे. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वीच कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं होतं, तर मुख्यमंत्रिपदाचे दुसरे दावेदार ज्योतिरादित्य सिंधियांना कॅम्पेन कमिटीचे अध्यक्षपद दिलं होतं. परंतु मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांपेक्षा कमलनाथ यांचं वजन जास्त आहे. त्यांच्या प्रचार यंत्रणेतील सक्रिय सहभागामुळेच काँग्रेसला मध्य प्रदेशात एवढं मोठं यश मिळाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राहुल गांधी मुख्यमंत्रिपद कमलनाथ यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. 

    टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018