शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 18:13 IST

अवघ्या 22 दिवसांमध्ये सुनावली शिक्षा

भोपाळ: अवघ्या चार महिनांच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिचा हत्या करणाऱ्या नराधमाला इंदोरच्या सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 22 दिवसांमध्ये या प्रकरणाचा निकाल लागला आहे. इंदोरमध्ये 20 एप्रिल रोजी चार वर्षांच्या चिमुरडीवर सुनील भील (21) नावाच्या तरुणानं बलात्कार केला होता. या चिमुरडीचा मृतदेह शिव विलास पॅलेसमध्ये सापडला होता. चार वर्षांची चिमुरडी 20 एप्रिल रोजी तिच्या पालकांसह राजवाडा परिसरात झोपली होती. त्यावेळी सुनीलनं तिचं अपहरण केलं.धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस सुरक्षा असतानाही सुनीलनं चिमुरडीचं अपहरण केलं. सीसीटीव्हीमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्हीत सुनील चिमुरडीला शिव विलास पॅलेसमध्ये नेताना दिसत होता. पहाटे पावणे पाचच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. सुनील शिव विलास पॅलेसमधून एकटाच परतल्याचं दृश्यही सीसीटीव्हीत कैद झालं होतं. सीसीटीव्ही फुटेजमुळे सुनील भीलची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी शिव विलास पॅलेसमध्ये शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना पीडित चिमुरडीचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हत्येपूर्वी चिमुरडीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं. यानंतर सुनीलविरोधात मध्य प्रदेशच्या इंदोर सत्र न्यायालयात खटला सुरू झाला. अवघ्या 22 दिवसांमध्ये हा खटला निकाली निघाला असून सुनीलला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  

टॅग्स :Rapeबलात्कार