शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पोलीस भरतीमध्ये उमेदवारांच्या छातीवर लिहिले 'SC', 'ST'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 07:34 IST

'एमपी गजब है, सबसे अजब है' ही मध्यप्रदेशच्या पर्यटन विभागाची जाहिरात खूप गाजली होती. काल समोर आलेल्या घटनेनंतर आता 'एमपी गजब है, सबसे अजब है' असे वाटायला लागले आहे.

धार -  'एमपी गजब है, सबसे अजब है' ही मध्यप्रदेशच्या पर्यटन विभागाची जाहिरात खूप गाजली होती. काल समोर आलेल्या घटनेनंतर आता 'एमपी गजब है, सबसे अजब है' असे वाटायला लागले आहे. कारण  आरोग्य तपासणीदरम्यान पोलीस हवालदार पदासाठी निवड करण्यात आलेल्या आरक्षित वर्गातील उमेदवारांच्या छातीवरच त्यांची जात लिहल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकारामुळं मध्यप्रदेशमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यात आरक्षित जागेसाठी पोलिस भरती सुरु आहे.  या भरतीदरम्यान आरोग्य तपासणी सुरु असताना पोलीस हवालदार पदासाठी निवड करण्यात आलेल्या आरक्षित वर्गातील उमेदवारांच्या छातीवरच  एससी, एसटी असे लिहिण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या प्रकारामुळे सोशल मीडियावर नेटीझन्सकडून सरकारवर टीका व्यक्त होत आहे. 

धार जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी आरक्षित जागांसाठी भरतीचे अभियान चालवले गेले. सध्या निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची आरोग्य तपासणीही सुरु आहे. ओबीसी-एनटीसाठी 168 सेमी आणि एस-एसटीसाठी 165 सेमीची मर्यादा आहे. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या उमेदवारांच्या ओळखीसाठी जिल्हा रुग्णालयाने मात्र एक वेगळीच पद्धत अवलंबली. तपासणीदरम्यान आरक्षित वर्गाच्या उमेदवारांच्या थेट छातीवरच त्यांचा वर्ग नमूद करण्यात आला.   असा प्रकार घडल्याचे पोलीस अधीक्षक वीरेंद्र सिंह यांनी मान्य केले. या प्रकाराबाबत माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या वेळी उमेदवारांची आरोग्य तपासणी होत असताना काही चूका झाल्या. अशा चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी रुग्णालयाने असे केले का हे तपासण्यात येत आहे. मात्र, रुग्णालयाने असे नेमके कशासाठी केले याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असेही सिंह म्हणाले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश