मध्यप्रदेशात बस नदीत कोसळून, १५ ठार

By admin | Published: December 15, 2015 01:21 PM2015-12-15T13:21:06+5:302015-12-15T13:21:06+5:30

मध्यप्रदेशच्या होशंगाबाद जिल्हयामध्ये मंगळवारी सकाळी खासगी प्रवासी बस नदीत कोसळली.

In Madhya Pradesh, bus collapses in river, 15 dead | मध्यप्रदेशात बस नदीत कोसळून, १५ ठार

मध्यप्रदेशात बस नदीत कोसळून, १५ ठार

Next

ऑनलाइन लोकमत 

भोपाळ, दि. १५ - मध्यप्रदेशच्या होशंगाबाद जिल्हयामध्ये मंगळवारी सकाळी खासगी प्रवासी  बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १५ प्रवासी ठार झाले तर, २५ प्रवासी जखमी झाले. इंदूरहून बस परासियाच्या दिशेने येत असताना, लोंगाबंजारी गावाजवळ अपघात झाला. 

बस नदीवर बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलावरुन जात असताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस नदीत कोसळली. सोहागपूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युध्दस्तरावर सुरु आहे. 

Web Title: In Madhya Pradesh, bus collapses in river, 15 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.