भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जससशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहे. राज्यात 15 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधींनाही काही ठिकाणी तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. भाजपाच्या मंदसौर विधानसभा मतदारसंघातील आमदारांनाही प्रचारादरम्यान स्थानिकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. तसेच वादावादीदरम्यान एका तरुणाने या आमदारांच्या श्रीमुखात भडकवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मंदसौर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेल्या यशपाल सिंह सिसोदिया यांना भाजपाने येथून पुन्हा एकदा तिकीट दिले आहे. येथे त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवरा नरेंद्र नाहटा यांचे आव्हान आहे. सिसोदिया हे सध्या आपल्या मतदारसंघात प्रचार करत असून, प्रचार दौऱ्यादरम्यान काही ठिकाणी त्यांना लोकांच्या विरोधाचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान, मंदसौरमधील अलावदाखेडी गावात प्रचार करत असताना एका युवकाने सिसेदिया यांच्या श्रीमुखात भडकवली. ऐन प्रचार अभियानादरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली. दरम्यान, यशपाल सिंह सिसोदिया यांना मारहाण करणाऱ्या तरुणाचे मानसिक संतुलन बिघडलेले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सदर तरुणाच्या वडिलांनी दिली आहे. तरुणाचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच संबंधित आमदारांनीही या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या निवडणुकीत प्रचारादरम्यान, भाजपाच्या नेत्यांना मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. याआधी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची पत्नी साधना सिंह आणि मंत्री दीपक जोशी यांनाही विरोधाचा सामना करावा लागला होता.
मध्य प्रदेशमध्ये प्रचार करायला आलेल्या भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 12:37 IST
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जससशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहे.
मध्य प्रदेशमध्ये प्रचार करायला आलेल्या भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण
ठळक मुद्दे मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जससशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहेराज्यात 15 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधींनाही काही ठिकाणी तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहेभाजपाच्या मंदसौर विधानसभा मतदारसंघातील आमदारांनाही प्रचारादरम्यान स्थानिकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला