शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कोविशील्डचे १० हजार डोस गायब; आता डोसही मिळेनात अन् रुग्णालयही सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 14:38 IST

सीरमकडून थेट खरेदी केलेले कोरोना लसींचे डोस अचानक गायब झाल्यानं खळबळ

जबलपूर: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १ लाखाच्या खाली आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याचं काम सुरू आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्यानं अनेक राज्यांमध्ये लसीकरणाला ब्रेक लागत आहे. त्यातच मध्य प्रदेशात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कौतुकास्पद! 'या' गावातील लोक झाले 'लस'वंत; 18 किमी चालून आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं लसीकरणमध्य प्रदेशच्या जबलपूरमधील मॅक्स हेल्थ केयर रुग्णालयाच्या नावानं कोविशील्डचे १० हजार डोस खरेदी करण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे डोस कुठे गेले याची माहिती कोणाकडेही नाही. जबलपूरमध्ये अशा नावाचं कोणतंही रुग्णालय नसल्याचं जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांनी सांगितलं. दोन दिवस रुग्णालयाचा शोध सुरू होता. मात्र अशा नावाचं कोणतंही रुग्णालय आढळून आलं नाही. त्यामुळे कोविशील्डच्या लसी कोणी खरेदी केल्या आणि त्या आता कुठे आहेत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बाे शीतगृह, जागेची चाचपणी सुरूमध्य प्रदेशातील ६ खासगी रुग्णालयं थेट सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविशील्ड लसी खरेदी करत आहेत. जबलपूर, भोपाळ, ग्वाल्हेरमधील प्रत्येकी एक आणि इंदूरमधील तीन खासगी रुग्णालयांचा यात समावेश आहे. या रुग्णालयांनी आतापर्यंत ४३ हजार डोस खरेदी केले आहेत. यापैकी जबलपूरमधील मॅक्स हेल्थ केयर इन्स्टिट्यूटनं १० हजार डोस खरेदी केले आहेत. एका वायलमध्ये १० डोस असतात.लसीकरणाशी संबंधित ऍपवर दोन दिवसांपूर्वीच मला एक मेसेज मिळाल्याचं लसीकरण अधिकारी डॉ. शत्रुघ्न दहिया यांनी सांगितलं. 'जबलपूरमधील मॅक्स हेल्थ केअर इन्स्टिट्यूटला १० हजार डोस देण्यात आल्याची माहिती होती. मी पहिल्यांदाच या रुग्णालयाचं नाव ऐकलं. सीएमएचओच्या माध्यमातून या रुग्णालयाचा शोध घेण्यात आला. मात्र या नावाच्या कोणत्याही रुग्णालयाची नोंद सापडली नाही. भोपाळमधील अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे,' असं दहिया म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस