शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

एम. जे. अकबर यांची जबानी ३१ आॅक्टोबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 5:36 AM

बदनामी खटल्यात दिल्ली न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : ‘मी टू’ मोहिमेत केल्या गेलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांवरून माजी परराष्ट्र राज्यमंत्री व ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर यांनी महिला पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी फिर्यादीत न्यायालय एम. जे. अकबर यांची जबानी ३१ आॅक्टोबर रोजी नोंदविणार आहे.

एम. जे. अकबर यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयातील अतिरिक्त महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी भादंवि कलम ४९९ व ५०० अन्वये खटल्यासाठी दाखल केलेल्या फिर्यादीची दखल घेतली. आरोपीला समन्स काढायचे की नाही हे ठरविण्यासाठी स्वत: अकबर व त्यांच्या साक्षीदारांची साक्ष ३१ आॅक्टोबर रोजी नोंदविण्याचे निर्देश दंडाधिकाऱ्यांनी दिले.

एम. जे. अकबर स्वत: गुरुवारी न्यायालयात हजर नव्हते. मात्र ३१ तारखेला जबाब नोंदवायचा असल्याने त्यांना त्या दिवशी हजर राहावे लागणार आहे. एम. जे. अकबर यांच्या वतीने दंडाधिकाºयांपुढे युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील गीता ल्युथरा व अ‍ॅड. संदीप कपूर यांनी सुरुवातीस रमानी यांनी एम. जे. अकबर यांच्या विरोधात नेमके काय टिष्ट्वट केले होते, याचा थोडक्यात आढावा घेतला.अकबर पक्षात नकोतचमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या एम. जे. अकबर यांनी पक्षच सोडून जावे, असे वातावरण भाजपामध्ये आहे. लैंगिक छळाचा आरोप झालेले अकबर यांच्यामुळे भाजपाला विचित्र स्थितीला तोंड द्यावे लागत असल्याने त्यांच्याविरुद्ध पक्षात वातावरण तयार झाले आहे.अकबर यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचे काय करायचे असा पेच पक्षासमोर आहे. त्यांच्यासोबत काम करणे महिलांना अवघडल्यासारखे झाल्यामुळे अकबर यांचा उपयोग कसा करून घ्यावा हाही पक्षापुढे प्रश्न आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकबर यांना भेटण्याचे टाळत निर्णय घेतला, सुषमा स्वराज यांना भेटण्याचा सल्ला दिला. पण त्यांनी अकबर यांना फोनवरच तुम्ही पंतप्रधानांना बोला असे सुचविले होते.

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरMetoo CampaignमीटूBJPभाजपा