शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Lumpy Skin Disease: गायींनंतर आता कुत्र्यांना लंपी व्हायरसची लागण? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 19:11 IST

गायींमध्ये पसरणाऱ्या लम्पी त्वचा रोगाने कहर केला आहे. या आजारामुळे आतापर्यंत लाखो गायींचा मृत्यू झाला आहे.

रतलाम: गायींमध्ये पसरणाऱ्या लम्पी त्वचा रोगाने (lumpy Skin Disease) देशात कहर केला आहे. या धोकादायक आजारामुळे आतापर्यंत लाखो गायींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कुत्र्यांमध्येही हा आजार पसरत असल्याचा दावा करण्यात येतोय. मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील जावरा येथे लम्पी व्हायरसग्रस्त कुत्र्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दावा केला जातोय की, कुत्रेदेखील लम्पी व्हायरसला बळी पडत आहेत. ही घटना खरी असेल, तर ही अतिशय गंभीर बाबत आहे. मात्र, स्थानिक पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुत्र्यांमध्ये लम्पीची शक्यता फेटाळून लावली आहे. या प्रकरणाला पाच ते दहा दिवसांचा कालावधी लोटले असून, पशुवैद्यकीय विभागाचे उपसंचालक डॉ.शर्मा यांना या प्रकरणाची माहिती नाही. या निष्काळजीपणामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

8-10 कुत्र्यांमध्ये लम्पीसारखी लक्षणे जावरा नगरमधील आठ ते दहा भटक्या कुत्र्यांमध्ये लम्पी व्हायरसची लक्षणे दिसून आली आहेत. या कुत्र्यांच्या अंगावर फोड आले आहेत, त्यामुळे त्यांना खाज येण्यासारख्या समस्याही होत आहेत. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. स्थानिक लोक याला लम्पी व्हायरस म्हणत आहेत.

भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढरतलाम जिल्ह्यातील लोक भटक्या कुत्र्यांमुळे हैराण झाले आहेत. त्यांची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात एबीसी (नसबंदी) कार्यक्रमानंतर कुत्रे अधिक हिंसक झाले आहेत. जावराचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पी.एस.कुशवाह यांच्या म्हणण्यानुसार लम्पी विषाणू फक्त गायी आणि म्हशींमध्ये दिसून आला आहे. कुत्र्यांच्या शरीरावर आलेल्या गुठळ्या लम्पीच्या आहेत की, नाही याबाबत तपासणी करावी लागेल. 

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगdogकुत्रा