शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:11 IST

Lufthansa Hyderabad Flight : फ्रँकफर्टहून हैदराबादला जाणाऱ्या लुफ्थांसाच्या विमानाला भारतीय हवाई हद्दीबाहेर असताना बॉम्बची धमकी मिळाल्यामुळे त्या विमानाला पुन्हा यु-टर्न घ्याला लागला.

Lufthansa Hyderabad Flight : रविवारी संध्याकाळी हैदराबादला जाणाऱ्या लुफ्थांसाच्या विमानाला यू-टर्न घेऊन फ्रँकफर्ट विमानतळावर परत उतरावे लागले. फ्लाइट LH752 जर्मनीहून निघाली होती. सोमवारी सकाळी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याचे नियोजन होते. पण, अचानक या विमानाला मागे वळावे लागले. 

Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

लुफ्थांसाच्या एअरलाइन्सने सांगितले की, आम्हाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणूनच विमानाने यू-टर्न घेतला आणि परतले. "विमान भारतीय हवाई हद्दीबाहेर असताना बॉम्बची धमकी मिळाल्याने विमान त्याच्या मूळ जागेवर परतले," असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नेमकं प्रकरण काय?

१५ जून २०२५ रोजी संध्याकाळी ६.०१ वाजता हैदराबाद विमानतळावरील लुफ्थांसा फ्लाइट LH 752 ला बॉम्ब धोक्याचा ईमेल मिळाला. बॉम्ब धमकीनंतर, एक समिती स्थापन करण्यात आली आणि SOP नुसार सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले. सुरक्षिततेच्या दृष्टीने, विमान कंपनीला मूळ ठिकाणी किंवा जवळच्या योग्य विमानतळावर परतण्याचा सल्ला देण्यात आला.

तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग

तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री ब्रिटिश लढाऊ विमान-35 चे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. इंधन संपल्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात केले आहे. 

विमानाने विमानवाहू जहाजावरून उड्डाण केले आणि रात्री ९:३० च्या सुमारास सुरक्षितपणे उतरले. वैमानिकाने कमी इंधनाची माहिती दिली आणि उतरण्याची परवानगी मागितली. केंद्र सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर इंधन भरण्याचे काम केले जाईल.

F-35 हे जगातील सर्वात धोकादायक लढाऊ विमान आहे. हे अत्याधुनिक पाचव्या पिढीचे स्टेल्थ लढाऊ विमान सध्या इंडो-पॅसिफिक प्रदेशात तैनात आहे. ते जगातील सर्वात धोकादायक लढाऊ विमान मानले जाते. अलीकडेच त्यांनी भारतीय नौदलासोबत संयुक्त लष्करी सरावातही भाग घेतला. हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान ब्रिटिश युद्धनौका एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्सच्या वाहक स्ट्राइक गटाचा भाग आहे, हे सध्या ऑपरेशनमध्ये आहे.

टॅग्स :airplaneविमान