शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुगलसराय रेल्वे स्टेशननंतर आता 'या' तीन विमानतळांची नावं बदलणार योगी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 09:36 IST

मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय ठेवण्यात आल्यानंतर आता काही विमानतळांची नावं बदलण्यासाठी योगी सरकार प्रयत्नशील आहे.

लखनऊः मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय ठेवण्यात आल्यानंतर आता काही विमानतळांची नावं बदलण्यासाठी योगी सरकार प्रयत्नशील आहे. बरेली, कानपूर आणि आग्रा विमानतळांचं नाव बदलण्याचा प्रस्ताव योगी सरकारनं केंद्राला दिला आहे.  एका प्रवक्त्याच्या माहितीनुसार, योगी सरकारनं दिलेल्या प्रस्तावात बरेली विमानतळाचं नाव 'नाथ नगरी' करण्याचे प्रस्तावित आहे. नाथ नगरी हे बरेली शहराचं जुनं नाव आहे.नाथ संप्रदायाशी संबंधित असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी गोरखपूरमधल्या भारतीय हवाईदलाच्या तळाचंही नाव बदललं आहे. त्या हवाईतळाचं नाव महायोगी गोरखनाथ नावावरून ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाथ संप्रदायाचं प्रेरणास्थान असलेल्या गोरक्षनाथ पीठाचे महंतही आहेत.उत्तर प्रदेशचे नागरी उड्डाण मंत्री नंद गोपाल नंदी म्हणाले, तीन विमानतळांचं नावं बदलण्याची मागणी जुनीच आहे. आम्ही या विमानतळांची नावं बदलण्याचा केंद्राकडे आग्रह केला आहे. त्यासंदर्भात आमची नागरी उड्डाण मंत्रालयातील अधिका-यांबरोबर लवकरच बैठक होणार आहे. कानपूरमधल्या चकेरी विमानतळाचं नाव स्वातंत्र्य सेनानी गणेश शंकर विद्यार्थी यांच्या नावावरून ठेवावं, असं प्रस्तावित आहे. कानपूरला पूर्वी कान्हा पूरच्या नावानं ओळखलं जात होतं. सचेंडीचे राजा हिंदू सिंह यांनी कान्हा पूरची स्थापना केली होती. आग्रा विमानतळाचं नाव दीनदयाल उपाध्याय यांच्या नावावरून ठेवण्याचंही प्रस्तावित आहे.