शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकाला देशासाठी अर्पण करतो, रॉबर्ट वाड्रांच्या भावुक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 18:01 IST

लखनऊमध्ये प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो सुरू आहे.

नवी दिल्ली- लखनऊमध्ये प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो सुरू आहे. याचदरम्यान प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुकवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. रॉबर्ट वाड्रांच्या या भावुक पोस्टमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. रॉबर्ट वाड्रा फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, तू माझी खरी मैत्री आहे. योग्य सहचारिणी आणि माझ्या मुलांसाठी चांगली आई असल्याचं तू सिद्ध केलं आहेस. परंतु आजची राजकीय परिस्थिती दुर्भाग्यपूर्ण आहे. मला माहीत आहे की, तू तुझी जबाबदारी योग्य पद्धतीनं निभावशील.रॉबर्ट वाड्रा पुढे लिहितात, मी प्रियंकाला देशासाठी अर्पण करतो. भारतीय जनतेनं त्यांची काळजी घ्यावी, अशी पोस्ट रॉबर्ट वाड्रांनी टाकल्यामुळे सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेसच्या महासचिवपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर आज प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. प्रियंका राजकारणात सक्रिय होत असल्याच्या निमित्तानं काँग्रेसनं राज्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. उत्तर प्रदेशात गलितगात्र अवस्थेत असलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागणार आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी प्रियंका यांच्या खांद्यावर आहे. समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीचा आणि सत्ताधारी भाजपाचा मुकाबला करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

'बदलाव की आंधी, प्रियंका गांधी' अशा घोषणा रोड शो दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. याशिवाय लखनऊमध्ये प्रियंका आणि राहुल गांधींचे पोस्टरदेखील लावण्यात आले. प्रियंका यांच्या रोड शोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह खासदार ज्योतिरादित्य सिंधियादेखील उपस्थित आहेत. सिंधिया यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. या रोड शो दरम्यान राहुल यांनी पुन्हा एकदा राफेल विमान कराराचा मुद्दा उपस्थित केला. राहुल आणि प्रियंका बसमधून रोड शो करत आहेत. त्यावेळी त्यांच्या हातात राफेल विमानाचं कट आऊट पाहायला मिळालं. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है अशी घोषणाबाजी केली. याशिवाय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातातही राफेलचं कटआऊट पाहायला मिळालं.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी