शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी लखनऊ मेट्रोमध्ये बिघाड; प्रवाशांना शिडीच्या मदतीने उतरवलं मेट्रोतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 18:31 IST

मोठा गाजावाजा करून  मंगळवारी उद्धाटन करण्यात आलेल्या लखनऊ मेट्रोमध्ये पहिल्याच दिवशी बिघाड झाला.

ठळक मुद्दे मोठा गाजावाजा करून  मंगळवारी उद्धाटन करण्यात आलेल्या लखनऊ मेट्रोमध्ये पहिल्याच दिवशी बिघाड झाला. मेट्रो सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.मेट्रोत बिघाड झाल्याने जवळपास एक तास आलमबाग स्टेशनवर मेट्रो उभी होती.

लखनऊ, दि. 6- मोठा गाजावाजा करून  मंगळवारी उद्धाटन करण्यात आलेल्या लखनऊ मेट्रोमध्ये पहिल्याच दिवशी बिघाड झाला. दोन वर्ष अकरा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर लखनऊ मेट्रो सुरू झाली, पण मेट्रो सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रोत बिघाड झाल्याने जवळपास एक तास आलमबाग स्टेशनवर मेट्रो उभी होती. त्यानंतर दुसऱ्या मेट्रोच्या मदतीने बिघाड झालेली मेट्रो हटवण्यात आली. तसंच बिघाड झालेल्या मेट्रोत असणाऱ्या प्रवाशांना शिडीच्या मदतीने मेट्रोतून उतरवण्यात आलं.

लखनऊ मेट्रो सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. लखनऊ मेट्रोमध्ये आलमबाग स्थानकाजवळ अचानक बिघाड झाला. त्यामुळे ही मेट्रो एक तास जवळपास रखडली होती. मेट्रोच्या दुरुस्तीसाठी इंजिनिअरही बोलवण्यात आले होते. या बिघाडामुळे मेट्रो वाहतूक विस्कळीत झाली होती. तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो विस्कळीत झाली असल्याचं स्पष्टीकरण लखनऊ मेट्रोच्यावतीने देण्यात आलं.  ‘सकाळी ७.१५ वाजता मेट्रो चारबागहून ट्रान्सपोर्ट नगरला जात होती. यावेळी दुर्गापुरी आणि मावैया स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. मेट्रोमुळे झालेल्या बिघाडामुळे आपत्कालीन ब्रेक वापरुन ती थांबवण्यात आली,’ अशी माहिती लखनऊ मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रसिद्धीपत्रकातून दिली. मेट्रो बिघाडावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत मेट्रो प्रशासनावर राग व्यक्त केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईक आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लखनऊमधील मेट्रो सेवेचं उद्धाटन केलं. पण उद्धाटनानंतरच्या पहिल्याचं दिवशी मेट्रोमध्ये बिघाड झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना त्यांचा चांगलाच मनस्ताप झाला.

लखनऊमध्ये मेट्रो सध्या ट्रान्सपोर्ट नगर ते चारबागमध्ये धावणार आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लखनऊ मेट्रो सुरू राहणार आहे. लखनऊमध्ये मेट्रोतून प्रवास करण्यासाठी 10 रूपयांपासून ते तीस रूपयांपर्यंत तिकीटाचे दर ठेवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील इतर दुसऱ्या शहरातही मेट्रो सुरू करण्यावर सध्या विचार सुरू आहे. त्यासाठी यूपी मेट्रो कॉर्पोरेशनची निर्मिती करण्यात येइल, असं या उद्धाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ