शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

योगींचा एक आदेश अन् १७ हजार ठिकाणी 'आवाज' झाला कमी, लोकांनी स्वत:हून लाऊडस्पीकर उतरवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 08:34 IST

उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या आदेशानंतर धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाला आहे.

लखनौ-

उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या आदेशानंतर धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाला आहे. यासोबतच १२५ ठिकाणी लाऊडस्पीकर आणि भोंगे हटविण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे एडीजींनी याबाबतची माहिती दिली आहे. लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर कोर्टाच्या निर्णयाचे राज्यात पालन केलं जात आहे, असं पोलीस अधिकारी म्हणाले. 

कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १२५ ठिकाणी लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. १७ हजार ठिकाणी लोकांनी स्वत:हून भोंगे आणि लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला आहे. नमाज पठणासंदर्भात सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेतली जात आहे. तसंच शांती समितीची बैठक देखील झाली आहे. 

राज्यात ३७ हजार धर्मगुरूंशी झाली चर्चाप्रशांत कुमार यांच्या माहितीनुसार राज्यात जवळपास ३७ हजार ३४४ धर्मगुरूंसोबत चर्चा झाली आहे. ३१ हजार जागांवर अलविदा नमाज अदा केली जाणार आहे. याशिवाय ७५०० ईदगाह आणि २० हजार मशिदींमध्ये नमाज अदा केली जाणार आहे. यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून ४८ कंपन्या पीएसी, ७ कंपनी केंद्रीय निम्नसैनिक दल तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 

श्रीकृष्ण जन्मभूमीवरील लाऊडस्पीकर हटवलेदेशात धार्मिक सलोख्याचं उदाहरण ठेवत नुकतंच श्री कृष्ण जन्मभूमीमधील लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. येथील मंदिर परिसरातील भागवत भवनच्या कळसावर लाऊडस्पीकर आहेत. त्यावर दिवसभरात जवळपास एक ते दीड तास मंगलाचरण आणि विष्णू सहस्त्रनाम वाजवण्यात येत असे. यानंच दिवसाची सुरुवात होत असे. आता ते थांबविण्यात आलं आहे. 

गोरखनाथ मंदिरातही 'आवाज' कमीगोरखनाथ मंदिर परिसरातील लाऊडस्पीकरचाही आवाज कमी करण्यात आला आहे. यासोबतच कानपूर, लखनौ, नोएडा आणि इतर शहरांमध्येही धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले स्पीकर हटविण्यात आले आहेत किंवा आवाज कमी करण्यात आला आहे. 

परवानगीविना मिरवणूक, जुलूस चालणार नाहीराज्यातील सर्व धार्मिक आयोजनांमध्ये आणि धार्मिक स्थळांवर शांतता कायम ठेवण्यासाठी परवानगीविना कुणालाही जुलूस किंवा मिरवणूक काढता येणार नाही. तसंच धार्मिक कार्यक्रमावेळी अशा स्थळांमध्ये लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचेही आदेश सरकारनं दिले आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश