शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता घरा-घरात पाइपलाइननं पोहोचणार गॅस; मोठा दिलासा देण्याच्या तयारीत मोदी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 23:34 IST

उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात एलपीजी पोहोचवल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने देशात गॅस पाइपलाइनची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकार एलपीजीसंदर्भात मोठी तयारी करत आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात एलपीजी पोहोचवल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने देशात गॅस पाइपलाइनची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. सोमवारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

आता प्रत्येक घरात पाइपलाइननं पोहोचणार गॅस - पुरी म्हणाले, गॅस पाइपलाइनच्या विस्तारीकरणाच्या कामानंतर, भारतातील 82 टक्के भूभाग आणि 98 टक्के लोकसंख्येला पाइपलाइनद्वारे एलपीजी पुरवठा केला जाईल. गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी आणि त्याच्या विस्तारीकरणाच्या कामासाठीची बोली प्रक्रिया याचवर्षी 12 मेरोजी सुरू केली जाईल. 

देशातील 98 टक्के लोकांना होणार फोयदा - हरदीप सिंग पुरी म्हणाले, 'बोली प्रक्रियेनंतर पायाभूत सुविधांची ब्लू प्रिंट तयार केली जाईल. यासाठी ठराविक वेळ लागतो. बोलीच्या 11व्या फेरीनंतर, 82 टक्क्यांहून अधिक भूभाग आणि 98 टक्के लोकांना एलपीजी पाइपलाइन दिली जाऊ शकेल.'

काही दुर्गम भागांपर्यंत गॅस पाइपलाइन पोहोचू शकणार नाही -डोंगराळ भागांचा उल्लेख करत हरदीप सिंग पुरी म्हणाले, ईशान्येकडील आणि जम्मू-काश्मीरमधील काही दुर्गम भाग  गॅस पाइपलाइनच्या कक्षेत येऊ शकणार नाहीत. तसेच,  एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत पाईप द्वारे येणारा स्वयंपाकाचा गॅस स्वस्त आणि ग्राहकांसाठी अधिक अनुकूल आहे. याच बरोबर, 1,000 एलएनजी स्टेशन प्रस्तावित असून 50 एलएनजी स्टेशन पुढील काही वर्षांत तयार होतील, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारCylinderगॅस सिलेंडर