शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

LPG Gas Cylinder: चीनचे 'भूत' पुन्हा एकदा भारतीयांच्या मानगुटीवर बसणार; LPG च्या किंमती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 09:14 IST

LPG Gas Cylinder price hike: अशावेळी घरगुती वापराच्या गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून दर १५ दिवसांनी २५-५० रुपयांची वाढ होत आहे.

एलपीजीच्या (LPG) वाढलेल्या किंमतीने आधीच गृहीणींचे बजेट बिघडलेले आहे. अशावेळी घरगुती वापराच्या गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून दर १५ दिवसांनी २५-५० रुपयांची वाढ होत आहे. गॅस सिलिंडर (Gas Cylinder ) महाग होत चालले आहेत. यात आता चीनमधील संकटाची भर पडली आहे. (LPG Gas cylinder price will increase soon)

चीनमध्ये कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे चीन सरकारने मिळेल तिथून नैसर्गिक गॅस आयात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात मोठी वाढ होत आहे, असे सांगितले जात आहे. यामुळे भारतात देखील गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यात १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर हा 908.4 रुपयांच्या आसपास आहे. तर व्यावसायीक १९ किलोच्या गॅस सिलिंडरचा दर हा 1715.5 रुपये आहे. १ सप्टेंबरला शेवटची दरवाढ झाली होती. सप्टेंबर २०२० मध्ये हाच गॅस सिलिंडरचा दर 596 रुपये होता. गेल्या वर्षभरात यामध्ये ३०० रुपयांची वाढ झाली आहे. सबसिडीही मिळत नसल्याने गृहीणींचे गणित बिघडले आहे. 

शहरात मध्यम आणि गरीब रेषेखाली अनेक कुटुंबे राहतात. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी लाकडांवर जळणाऱ्या चुली वापरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या शहरी लोकांकडे महागडा गॅस सिलिंडर घेण्यापासून पर्याय राहिलेला नाही. घरगुती वापराच्या गॅस आणि सीएनजीमध्ये येत्या काळात १० ते २० टक्के दरवाढ होण्य़ाची शक्यता आहे. खासगी कंपन्यांकडून गॅस घेण्यासाठी सरकार सहा महिन्यांनी आढावा बैठक घेते, ती १ ऑक्टोबरला होणार आहे. नैसर्गिक गॅसला सीएनजी आणि पीएनजीमध्ये रुपांतरीत केले जाते. भारत आपल्या गरजेच्या ५० टक्के गॅस आयात करतो. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरchinaचीन