शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कांदे, बटाटे, भाज्या कडाडल्या असताना गॅस ग्राहकांना मोठा दिलासा; पण...

By कुणाल गवाणकर | Updated: November 1, 2020 10:53 IST

देशभरात सिलेंडरच्या किमती स्थिर; सर्व कंपन्यांकडून घोषणा

नवी दिल्ली: कांदा, बटाट्यासह भाज्यांच्या किमती कडाडल्या असताना सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. याआधी ऑक्टोबरमध्येही एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीनं घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतेही बदल केलेले नव्हते. सध्या भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कांद्याच्या दरानंही सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अशा परिस्थितीत सिलेंडरच्या किमती स्थिर असल्यानं जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. मात्र व्यवसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात ७८ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर वाढू शकतात. याआधी जुलैमध्ये १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात ४ रुपयांची वाढ झाली होती. तर अनुदान नसलेल्या सिलेंडरचे दर दिल्लीत ११.५० रुपयांनी वाढले होते. ...तर आजपासून तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही; जाणून घ्या नवे नियमदेशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी असलेल्या आयओसीनं संकेतस्थळावर सिलेंडरचे नवे दर प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये असलेले दर नोव्हेंबरमध्येही लागू असतील. मुंबईत बिगर अनुदानित सिलेंडरची किंमत ५९४ रुपये आहे. दिल्लीतही सिलेंडरचा दर ५९४ रुपयेच आहेत. चेन्नईत मात्र सिलेंडरसाठी ६१० रुपये मोजावे लागत आहेत. कोलकात्यात सिलेंडरचा दर ६२० रुपये इतका आहे.आजपासून सिलेंडर, एसबीआय, डिजिटल पेमेंटचे नियम बदलणार; जाणून घ्या नवे नियमनोव्हेंबरमध्ये व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. चेन्नईत सिलेंडरच्या किमतीत सर्वाधिक ७८ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सिलेंडरचा दर १ हजार ३५४ वर गेला आहे. मुंबई आणि कोलकात्यात सिलेंडरचा दर ७६ रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईत सिलेंडरसाठी १ हजार १८९ रुपये, तर कोलकात्यात १ हजार २९६ रुपये मोजावे लागतील. दिल्लीत व्यवसायिक सिलेंडरचा दर १ हजार २४१ रुपये आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर