झारखंडच्या धनबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील प्रतिष्ठित 'बी.एस.एस. महिलामहाविद्यालया'च्या भिंतींवर एका तरुणाने पोस्टर्स चिटकवून आपल्या गर्लफ्रेंडची जाहीर माफी मागितली आहे. या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला असून संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने आपली चूक झाल्याचं मान्य करत अनेक पोस्टर्स लावले होते, ज्यामध्ये त्याने गर्लफ्रेंडला त्याला माफ करण्याची विनंती केली होती. याच दरम्यान महाविद्यालय प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार येताच तातडीने हे पोस्टर्स हटवण्यात आले. मात्र तोपर्यंत या पोस्टर्सचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
“मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली” असं पोस्टर्सवर म्हटलं आहे. हे प्रकरण अधिक गंभीर मानलं जात आहे कारण हे एका महिला महाविद्यालयातील आहे, जिथे विद्यार्थिनी सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत तरुणाचे हे धक्कादायक कृत्य महाविद्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतं.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. करुणा सिंह यांनी ही घटना गंभीर असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, "सकाळी या प्रकरणाची माहिती मिळाली. जेव्हा सुरक्षा रक्षक ते पोस्टर्स हटवण्यासाठी गेला, तेव्हा संबंधित तरुणाने त्याला धमकीही दिली." यानंतर तरुण तिथून पसार झाला होता.
महाविद्यालय प्रशासनाने याप्रकरणी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता या व्हायरल प्रकरणावर प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देतं आणि दोषीवर काय कारवाई होतं याकडेच सर्व पालकांचं लक्ष लागलं आहे.
Web Summary : In Dhanbad, a youth pasted posters at a women's college, publicly apologizing to his girlfriend. The college removed the posters which had gone viral. The principal reported the incident to the police, demanding strict action against the youth for creating a security concern.
Web Summary : धनबाद में एक युवक ने महिला कॉलेज में पोस्टर चिपकाकर सार्वजनिक रूप से अपनी गर्लफ्रेंड से माफी मांगी। कॉलेज ने वायरल हो चुके पोस्टरों को हटा दिया। प्राचार्य ने पुलिस को घटना की सूचना दी और युवक के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की।