शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'प्रेमी जोडपे अशी गळाभेट घेतात जणू खाऊन टाकतील, त्यांना तुरूंगात टाका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 17:48 IST

मोटारसायकल असो, कार असो किंवा गार्डन प्रेमी जोडपे सर्वत्र त्यांच्या प्रेमाचं प्रदर्शन करताना दिसतात. प्रेमी जोडपे एकमेकांची अशी गळाभेट घेतात जणू ती तरूणी किंवा तरूण एकमेकांना खाऊन टाकतील

भरतपूर(राजस्थान), दि. 21 - सातत्याने वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. सार्वजनिकपणे प्रेमाचं प्रदर्शन करणा-या प्रेमी जोडप्यांना तुरूंगात टाकावं असं विधान त्यांनी केलं आहे. 

मोटारसायकल असो, कार असो किंवा गार्डन प्रेमी जोडपे सर्वत्र त्यांच्या प्रेमाचं प्रदर्शन करताना दिसतात. प्रेमी जोडपे एकमेकांची अशी गळाभेट घेतात जणू ती तरूणी किंवा तरूण एकमेकांना खाऊन टाकतील असं उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथून लोकसभेचे खासदार असलेले साक्षी महाराज म्हणाले. राजस्थानच्या भरतपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना साक्षी महाराज म्हणाले, काही चुकीचं घडण्याआधी अशा जोडप्यांवर कारवाई करून त्यांना तुरूंगात टाकायला पाहिजे असं ते म्हणाले. प्रेमी जोडप्यांच्या अशा कृत्यांकडे सर्वजण दुर्लक्ष करतात पण बलात्कार झाल्यावर पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली जाते. 

यापूर्वी साक्षी महाराजांनी बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगचा बचाव केला होता.   

काय म्हणाले होते राम रहीमच्या बचावात- बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर डेरा प्रमुखाची पाठराखण करण्यासाठी भाजपचे खासदार साक्षी महाराज पुढे सरसावले होते. हे प्रकरण म्हणजे भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे असे साक्षी महाराज यांनी म्हटले. 'कुण्या एकाच व्यक्तीने बाबा राम रहीम यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय, मात्र करोडो लोक त्यांना देव मानत आहेत', अशा शब्दात साक्षी महाराज यांनी दोषी ठरविण्यात आलेल्या बाबा राम रहीमचा बचाव केला.राम रहीमचा बचाव करताना भाजप खासदार साक्षी महाराज पुढे म्हणाले की, कोर्ट करोडो भक्त काय म्हणतात ते ऐकत नाही, केवळ एका तक्रारदाराचे म्हणणे मात्र एकते. मग एक तक्रारदार बरोबर आहे की, करोडो भक्त?. कोर्टाने साधा माणूस असलेल्या राम रहीमला बोलावले, याचा अर्थ झालेल्या नुकसानीला कोर्टही जबाबदार आहे.भाजपचे आणखी एक नेता आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनीही नाव न घेता बाबा राम रहीमचा बचाव केला होता. स्वामींनी ट्विटद्वारे , 'साधूंसाठी नवी धमकी: राजनेता आणि आश्रमांमध्ये राहणारे साधू स्वामीजींना तुरूंगात पाठवून आश्रमातील संपतीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत. साधूंनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांना ताकद दिली पाहिजे.'असं म्हटलं होतं.