शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Love, Sex मुळे दहशतवादी फसतायत सुरक्षापथकांच्या जाळयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 13:16 IST

काश्मीर खो-यातील लष्कर-ए-तोयबाचा खतरनाक दहशतवादी अबू दुजानाला काल  सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातले. पत्नीला भेटण्याच्या तीव्र इच्छेमुळे दुजाना सुरक्षापथकांच्या जाळयात फसला.

ठळक मुद्दे पत्नीला भेटण्याच्या तीव्र इच्छेमुळे दुजाना सुरक्षापथकांच्या जाळयात फसला.लष्कर-ए-तोयबाच्या बहुतांश दहशतवाद्यांची घरची परिस्थिती हलाखीची असते.

श्रीनगर, दि. 2 - काश्मीर खो-यातील लष्कर-ए-तोयबाचा खतरनाक दहशतवादी अबू दुजानाला काल  सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातले. पत्नीला भेटण्याच्या तीव्र इच्छेमुळे दुजाना सुरक्षापथकांच्या जाळयात फसला. काश्मीर खो-यात सक्रीय असलेले अनेक परदेशी दहशतवाद्यांचे काश्मिरी तरुणींबरोबर प्रेमसंबंध आहेत. त्यामुळेच त्यांचा माग काढणे सुरक्षापथकांना शक्य झाले आहे. एरवी या दहशतवाद्यांचा माग काढणे कठीण असते पण प्रेयसी, पत्नीला भेटण्याची इच्छा, लैंगिकसंबंधांची आतुरता यामुळे हे दहशतवादी सहज सापळयात अडकत चालले आहेत. 

पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातून येणा-या लष्कर-ए-तोयबाच्या बहुतांश दहशतवाद्यांची घरची परिस्थिती हलाखीची असते. काश्मीरमध्ये आल्यानंतर हे दहशतवादी एकतर काश्मिरी तरुणींना आपल्या प्रेमात पाडतात किंवा बंदुकीच्या धाकावर त्या तरुणींना संबंध स्विकारायला भाग पाडतात असे जम्मू-काश्मीर पोलीस दलातील अधिका-याने सांगितले. 

प्रेम किंवा शरीरसंबंधांच्या ओढीने जेव्हा हे दहशतवादी वारंवार एखाद्या ठिकाणी येतात तेव्हा त्यांचा माग काढणे गुप्तचर यंत्रणांना सोपे जाते. प्रेम, शरीरसंबंधांची चटक लागल्यानंतर या दहशतवाद्यांचा प्रेयसी किंवा पत्नीला भेटायला जाण्याचा एक ठराविक पॅटर्न बनतो. लष्कर-ए-तोएबाचा अनेक दहशतवादी त्यांच्या या वागण्यामुळे सुरक्षापथकांच्या रडारवर आले आहेत. 

काहीवेळा दहशतवाद्यांकडून फसवणूक झालेल्या  महिला स्वत:चा सुरक्षापथकांना त्यांची टीप देतात. अशाच प्रेम प्रकरणामुळे लष्करचा कमांडर अबू तलहा 1999 साली सुरक्षापथकांच्या जाळयात फसला होता. तलहाचे ज्या मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. तिच्या वडिलांनीच तलहाची गुप्तचर यंत्रणांना टीप दिली होती. 

काश्मीर खो-यातून अटक करण्यात आलेला ‘लष्कर-ए-तैयबा’चा दहशतवादी संदीप शर्मा ऊर्फ  आदिलने दहशतवादासाठी नव्हे तर, प्रेमासाठी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे तपासातून समोर आले. संदीप काश्मीरमध्ये एका युवतीच्या प्रेमात पडला होता. तिच्यासोबत लग्न करता यावे यासाठी त्याने धर्मपरिवर्तन करुन इस्लाम धर्म स्वीकारला. संदीप ज्या कंत्राटदाराकडे नोकरी करायचा त्याला तपासयंत्रणांनी ताब्यात घेतले असून, याच कंत्राटदाराने संदीपला नोकरीसाठी काश्मीरला पाठवले होते. संदीप वेल्डींगचे काम करायचा. त्याने संदीपसह आणखी दोघांना त्याच कामासाठी काश्मीरला पाठवले होते.