शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डीजेच्या आवाजामुळे मुलीला हार्ट अटॅक; रुग्णालयाचा निष्काळजीपणा, वडिलांसमोर तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:18 IST

डीजेच्या मोठ्या आवाजाने एका १५ वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. मोठा आवाजामुळे मुलगी बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेलं, मात्र मुलीचा मृत्यू झाला.

डीजेच्या मोठ्या आवाजाने एका १५ वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. मोठा आवाजामुळे मुलगी बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेलं, मात्र मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांनी उपचारात निष्काळजीपणा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पिंकी कुमारी असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. ती हृदयरोगाने ग्रस्त होती. तिचे वडील रिक्षाचालक आहेत. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी आरोपी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंकी कुमारीच्या शेजारी एक कार्यक्रम सुरू होता. याच दरम्यान रथासह शोभायात्रा काढण्यात आली. पिंकी तिच्या कुटुंबासह घराबाहेर शोभायात्रा पाहण्यासाठी गेली होती. डीजेचा मोठा आवाज ऐकून पिंकी अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला बाईकवरून रुग्णालयात नेलं. रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली निष्काळजीपणा केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

मुलीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत निषेध करण्यास सुरुवात केली. स्थानिक लोकही मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. संतप्त लोक आरोपी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी करत होते. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे अध्यक्ष राजन नंदन सिंह देखील घटनास्थळी पोहोचले. हे स्पष्टपणे डॉक्टर आणि रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचं प्रकरण आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना भेटून संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल असं म्हटलं आहे.

वडिलांनी रिक्षा चालवून याआधी मुलीवर उपचार केले होते. मुलीचे काका मोतीलाल साह यांनी रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉक्टर आशिष कुमार यांच्यावर उपचारात निष्काळजीपणाचा आरोप केला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर सुमारे एक तासाने उपचार सुरू झाले. याचदरम्यान मुलगी वेदनेने तडफडत होती, परंतु कोणीही तिची काळजी घेतली नाही. वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीने जीव सोडला. त्यांनी याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच प्रशासनाकडे रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची आणि निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोगhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर