शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या एकत्रित मतांपेक्षा नोटाला अधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 17:06 IST

गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्या विधानसभांसाठी झालेल्या निवडणुकीतील मतांची मोजणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये मतदारांनी नोटाला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे.

मुंबई- गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्या विधानसभांसाठी झालेल्या निवडणुकीतील मतांची मोजणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये मतदारांनी नोटाला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुजरातमध्ये 5 लाखांहून अधिक मतदारांनी नोटाचे बटण दाबून यापैकी एकही उमेदवार पसंत नसल्याचे मत नोंदवले आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बहुजन समाजाला मिळालेल्या एकत्रित मतांपेक्षा अधिक पसंती नोटाला मिळाली आहे.

गुजरातमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला 1 लाख 83 हजार 834 मते तर बहुजन समाज पार्टीला 2 लाख 5 हजार 447 मते मिळाली आहेत तर नोटाला 5 लाख 46 हजार 206 जणांनी पसंती दिली आहे. गुजरातच्या विकासासाठी आम्हालाच निवडा असे सांगणारा भाजपा आणि भाजपाला आम्हीच पर्याय ठरू शकतो असे सांगणाऱ्य़ा कॉंग्रेससाठी नोटाने हे मोठे उत्तरच दिले आहे असे म्हणावे लागेल. हिमाचल प्रदेशातही नोटाला 32 हजार 750 लोकांनी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या राज्यात बहुजन समाज पार्टीला केवळ 17 हजार 327 मते मिळाली आहेत.

इव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा हार्दिकचा आरोपगुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला निसटता विजय मिळवण्यात यश मिळाल्यानंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल याने इव्हीएममध्ये झालेल्या गडबडीमुळे भाजपाचा विजय झाला, सनसनाटी आरोप केला आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मिळून इव्हीएमविरोधात आंदोलन छेडले पाहिजे असे आवाहन केले. तसेच गुजरातमध्ये यापुढेही पाटीदार आरक्षणाचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू करणार असल्याचा इशाराही त्याने दिला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना हार्दिक पटेलने भाजपाच्या विजयामध्ये इव्हीएमचा हात असल्याचा थेट आरोप केला. त्याने दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रामध्ये भाजपाने इव्हीएममध्ये घोळ केल्याचा दावा हार्दिक पटेलने केला. तसेच धोकेबाजी करून निवडणुक जिंकणाऱ्या भाजपाला शुभेच्छा अशी प्रतिक्रियाही त्याने दिली.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Electionनिवडणूक