शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

द्रष्टा उद्योगपती, सच्चा देशभक्त गमावला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 11:38 IST

व्यक्ती आणि सत्ता यांचा विचार न करता ते आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडत असत. आपल्या देशाला आगळ्या बौद्धिक उंचीवर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत -ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग जगताची अपरिमित हानी झाली आहे. ते केवळ द्रष्टे उद्योगपती नव्हते तर सच्चे देशभक्त होते. सामाजिक हितासाठी ते आपल्या उक्ती आणि कृतीतून आयुष्यभर झटत राहिले. त्यांनी कायम सत्याची कास धरली. वैयक्तिक लाभ, स्वार्थापलीकडे जाऊन त्यांनी देशविकासासाठी कार्य केले. संसदेत ते माझे सहकारी होते. पक्षीय राजकारणाचा विचार न करता राष्ट्रहितासाठीचे परखड विचार त्यांनी कायम मांडले.

व्यक्ती आणि सत्ता यांचा विचार न करता ते आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडत असत. आपल्या देशाला आगळ्या बौद्धिक उंचीवर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वर्ल्ड थिंक टँक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे ते महत्त्वाचे घटक होते. ‘पुणे लोकमत’च्या वास्तू लोकार्पण सोहळ्यात त्यांनी विशेष अतिथी या नात्याने व्यासपीठ भूषविले होते. तेव्हा त्यांनी व्यक्त केलेले विचार आजही माझ्या स्मरणात आहेत. अतिशय बहुमोल, चिंतनीय आणि दिशादर्शक वैचारिक भूमिका अत्यंत खुलेपणाने थेट शब्दांत त्यांनी मांडली होती.

जमनालालजी बजाज, कमलनयनजी बजाज आणि राहुल बजाज या तीनही पिढ्यांचे दर्डा परिवाराशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते. राहुल बजाज यांच्या निधनाचे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांची मुले राजीव, संजीव आणि सुनयना यांच्यासह सर्व परिवाराला मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या निधनाने लोकमत परिवाराने एक ज्येष्ठ आप्त आणि सच्चा हितचिंतक गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलVijay Dardaविजय दर्डा