शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

प्राणप्रतिष्ठा सुफळ संपूर्ण! बाहुबली मुनींद्र भगवान यांचा पंचकल्याणक महोत्सव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 17:58 IST

Lord Baahubali Munindra Panchkalyanak Mahotsav: या विशेष सोहळ्याला देश-विदेशातील १५ ते २० हजार लोकांनी उपस्थिती लावली होती.

Lord Baahubali Munindra Panchkalyanak Mahotsav: जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बाहुबली मुनींद्र भगवान यांचा पंचकल्याणक महोत्सव गुजरातमधील सोनगड येथे सुरू आहे. श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाची सांगता २६ जानेवारी रोजी महामस्तकाभिषेकाने होणार आहे. 

या भव्य आणि दिव्य सोहळ्याचे आयोजन सोनगडच्या श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टने केलं असून विश्वस्त नेमिषभाई शाह हे महोत्सवाचे मुख्य निमंत्रक आहेत. पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात प्रतिष्ठाचार्य सुभाषभाई शेठ आणि बालब्रह्मचारी हेमंतभाई गांधी यांच्यासह त्यांचे सहकाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने विधी केले. १९ जानेवारीपासून सुरू असलेल्या या महोत्सवात गर्भ कल्याणक, जन्मकल्याणक, तप कल्याणक, ज्ञान कल्याणक, मोक्ष कल्याणक असे विधी झाले असून, २६ जानेवारी रोजी नवीन प्रतिमांचे पूजन आणि महाअभिषेक असे विधी होणार आहेत. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, मनसुख मांडवीय यांनी विशेष हजेरी लावली. 

५० फुटांचा पर्वत आणि ४१ फुटांची भगवान बाहुबली यांची प्रतिमा

श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्ट यांनी सोनगड येथे एका मोठ्या परिसरात ५० फुटी पर्वत तयार केला असून, यावर ४१ फुटांची भगवान बाहुबली यांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. या परिसरात नूतन जिनमंदिर निर्माण केले असून, यामध्ये सुमारे १४० प्रतिमांची स्थापना करण्यात येत आहे. या सोहळ्याला केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून जैन समुदायातील भाविकांनी उपस्थिती लावली. या विशेष सोहळ्याला १५ ते २० हजार जैन भक्तगण उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, या महोत्सवात भगवान महावीर यांच्या प्रतिमेवर शास्त्रशुद्ध पद्धतीने अभिषेक करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, शोभायात्रा, गुरूंचे प्रवचन अशा विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

टॅग्स :Gujaratगुजरात