शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची चाहूल! लवकरच तारखा निश्चित होणार, नरेंद्र मोदी दर महिन्याला महाराष्ट्राचा दौरा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 09:58 IST

मोदी सरकारला ३० मे रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद साजरा करण्याऐवजी २०२४ ची तयारी सुरू केली आहे.

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅटट्रिक करण्याची तयारी सुरू केली आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या जूनपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांना महिन्यातून किमान एकदा तरी भेट देतील. तसेच, सरकारी योजनांचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने निवडणुकीचीही तयारी सुरू करणार आहेत.

मोदी सरकारला ३० मे रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद साजरा करण्याऐवजी २०२४ ची तयारी सुरू केली आहे. ३० मे ते ३० जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यक्रमांमध्ये २०२४ च्या तयारीचा समावेश आहे.

नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकांमुळे राज्यांमध्ये आपले कार्यक्रम निश्चित केले आहेत. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० जागा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी आता पूर्व उत्तर प्रदेशपासून सुरुवात करून दर महिन्याला एक किंवा दोन दिवस उत्तर प्रदेशात जातील. लोकसभेच्या जागांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रातील ४८ जागा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी पुढील महिन्यापासून प्रत्येक महिन्यात किमान एकदा तरी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

 महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी चर्चा करून तारखा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही दर महिन्याला महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. जे. पी. नड्डा यांनी नुकताच दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला. बिहारमधील लोकसभेच्या ४० जागा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी केंद्रीय योजनांच्या निमित्ताने बिहारमध्ये जाण्यास सुरुवात करणार आहेत.

■ मध्य प्रदेश आणि राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार आहेत.■ या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी राजस्थान आणि मध्य प्रदेशचा दौरा सुरू केला आहे.■ पंतप्रधान एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राजस्थानला जाऊन आले होते.■ जून सुरु होताच ते मध्य प्रदेशात जातील.■ तिथे ते पीक विमा योजनेवरील शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करतील.■ या राज्यांमध्ये जाण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्व मंत्रालयांकडून या राज्यांशी संबंधित योजनांचा तपशीलही मागवला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभा