शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लोकसभेत चर्चेदरम्यान घड्याळ बंद पडताच सुमित्रा महाजन म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 19:18 IST

गरीब सवर्णांना आरक्षण देणाऱ्या विधेयकावर चर्चा सुरू असताना घडला प्रकार

नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारनं लोकसभेत विधेयक मांडलं आहे. यावर सध्या चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना एक वेगळीच घटना घडली. काँग्रेस खासदार के. व्ही. थॉमस या विषयावर त्यांची मतं मांडत असताना लोकसभेतील घड्याळ बंद पडलं. ही बाब सदनातील एका सदस्यानं सभापती सुमित्रा महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर माझ्या हातात घड्याळ आहे. ते अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे चिंता करू नका, असं महाजन म्हणाल्या.आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्यासाठी मांडण्यात आलेल्या विधेयकावर सत्ताधारी पक्षाकडून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काँग्रेस खासदार के. व्ही. थॉमस बोलण्यासाठी उभे राहिले. थॉमस स्वत:ची मतं मांडत असताना लोकसभेतलं घड्याळ 5 वाजून 10 मिनिटांवर बंद पडल्याची माहिती एका सदस्यानं सुमित्रा महाजन यांना दिली. यावर माझ्या हातातलं घड्याळ सुरू असल्याचं त्या म्हणाल्या. 'माझ्या हातात घड्याळ आहे. तुम्ही चिंता करू नका. माझं घड्याळ सुरू आहे. ते अगदी व्यवस्थित वेळ दाखवतं,' असं महाजन यांनी म्हटलं. यानंतर काही सदस्यांनी आपापसात बोलण्यास सुरुवात केली. त्यांना महाजनांनी चहा पिऊन येण्याचा सल्ला दिला. याआधी सुमित्रा महाजन यांनी लोकसभेत उपस्थित असलेल्या सदस्यांना दोन तासांमध्ये विधेयकावरील चर्चा संपवणार का, असा प्रश्न विचारला. त्यानंतर चर्चा कितीही वेळ सुरू राहू द्या. मला काहीच अडचण नाही, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. मोदी सरकारनं आणलेलं हे विधेयक म्हणजे निवडणुकीआधीचा जुमला असल्याची टीका अनेक माध्यमांकडून केला जात असल्याचं काँग्रेस खासदार थॉमस म्हणाले. त्यावर सभागृहानं हे विधेयक मंजूर करावं. मग हा जुमला ठरणार नाही, असा चिमटा महाजन यांनी काढला.  

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनlok sabhaलोकसभाParliamentसंसद