शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

लोकसभेची आचारसंहिता ६ ते ८ मार्चला लागू?; मोदी करणार ७० दिवसांत ७० योजनांचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 06:27 IST

निवडणुका घोषित व्हायला व आचारसंहिता लागू व्हायला आता जेमतेम ७0 दिवस शिल्लक असून, ६ ते ८ मार्चच्या दरम्यान निवडणुकांची अधिकृत घोषणा आयोग करेल, असे दिसत आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यास आता सुरुवात झाली आहे. निवडणुका घोषित व्हायला व आचारसंहिता लागू व्हायला आता जेमतेम ७0 दिवस शिल्लक असून, ६ ते ८ मार्चच्या दरम्यान निवडणुकांची अधिकृत घोषणा आयोग करेल, असे दिसत आहे. त्यामुळे या ७0 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभराचा दौरा करून ७० नव्या योजना व प्रकल्पांची घोषणा करणार आहेत.रस्तेबांधणीसह सर्व पायाभूत सुविधा योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. ती कामे एक लाख कोटी रुपयांची आहेत.काँग्रेसवर हल्ला चढवण्यासाठी मोदी अनेक योजनांची उद्घाटने करतील. तसेच ज्या राज्यांत एम्सची कामे सुरू झाली आहेत, त्यांचे उद्घाटन फेब्रुवारीमध्ये मोदी करतील. पुढील ५0 दिवस ते उद्घाटन, पायाभरणी तसेच नव्या योजना व प्रकल्प यांसाठीच देणार आहेत.नव्या योजना व घोषणा यांसाठी हंगामी अर्थसंकल्पासाठी थांबायलाही मोदी सरकार तयार नाही. संसदेचे हिवाळी अधिवेशन ८ जानेवारी रोजी आटोपताच, तरुणांना रोजगार, एमएसएमई तसेच अन्य योजना जाहीर करण्यात येतील. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३0 जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात होईल.पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ७0 दिवसांच्या कामाचा आराखडा तयार केला असून, दर दिवशी एक प्रकल्प वा योजना हा त्याचाच भाग असेल. ‘फिर एक बार, मोदी सरकार’ हे भाजपाचे यंदाचे मिशन आहे. मोदी आज, शनिवारी वाराणसीमध्ये तर उद्या पोर्ट ब्लेअरमध्ये आहेत.भाजपाध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली व पीयूष गोयल यांनी २0१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाची योजना तयार केली आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही भाजपाची घोषणा निश्चित झाली असली तरी मोदी यांना याहून आकर्षक घोषणा हवी आहे.पीयूष गोयल यांनी देशाच्या विविध भागांमध्ये तीन संस्थांमार्फत जनमत चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या असून, या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तो सर्व्हे सुरू झाला आहे. त्याचे निष्कर्ष व अहवाल जानेवारीच्या दुसºया आठवड्यात मिळतील.याआधी आॅगस्टमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाला ३00 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र त्यानंतर लगेचच भाजपाचे बालेकिल्ले म्हणून ओळखल्या जाणाºया उत्तरेकडील तीन राज्यांत पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्या चाचण्यांच्या आधारे नियोजन करण्यात अर्थ नाही, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.दररोज किमान ४० खासदारांशी चर्चाअमित शहा यांनी ३५0 लोकसभा मतदारसंघांत काय रणनीती असावी, या दृष्टीने तयारी सुरू केली असून, रोज ते पक्षाच्या किमान ४0 खासदारांशी चर्चा करीत आहेत. बिहार, झारखंड व उत्तर प्रदेशातील खासदारांशी त्यांनी चर्चा पूर्ण केली आहे. तीन राज्यांच्या निकालांनंतर एकाही मतदारसंघात कमी तयारी नसावी, असे त्यांनी ठरविले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक