शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 06:12 IST

‘नमामी गंगे’ प्रकल्पासाठी हा निधी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंसिबिलिटी फंडातून देण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नमामी गंगे' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाने आज खारीचा वाटा उचलला. गंगा नदीला स्वच्छ करण्यासाठी ‘लोकमत’कडून नमामी गंगे फंडात ५७ लाख ५० हजार रूपयांचा निधी दिला आहे. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी जल शक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन ५७ लाख ५० हजार रूपयांचा धनादेश ‘नमामी गंगे’ प्रकल्पासाठी दिला. हा निधी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंसिबिलिटी फंडातून देण्यात आला आहे. यावेळी जल शक्ती मंत्रालयाच्या सचिव देबश्री मुखर्जी (जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण), संयुक्त सचिव पी के अग्रवाल, पूर व्यवस्थापन आयुक्त शरदचंद्र, कार्यकारी संचालक बिजेंद्र स्वरूप, ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरिश गुप्ता आणि प्रवीण भागवत उपस्थित होते.

देवेंद्र दर्डा यांनी जल शक्ती मंत्री पाटील यांच्याशी बोलताना तापीसह महाराष्ट्रातील प्रलंबिता प्रकल्पांवर चर्चा केली. तर, गंगा आणि यमुना नदी स्वच्छ करण्यासोबतच वाटर हार्वेस्टिंग आणि रिचार्ज, जल जीवन मिशना आणि नदी जोड प्रकल्पावर युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दर्डा यांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीला स्वच्छ करण्यासाठी २०१४ मध्ये 'नमामी गंगे' प्रकल्पाची घोषणा केली होती. नदीतील प्रदूषण कमी करणे, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणे हा या प्रकल्पाचा मूळ हेतू आहे-सांडपाणी, कचरा, घाट आणि स्मशानभूमीच्या व्यवस्थापनासोबतच जैवविविधतेचे संवर्धन करणेही या प्रकल्पाचा हेतू आहे.

महत्त्वाचे म्हणजे, गंगा नदी केवळ आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची नाही तर ११ राज्यातील ४७टक्के उपजीविकेसाठी अवलंबून आहे. लोकसंख्या गंगेवर जल शक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना ‘नमामी गंगे’ प्रकल्पासाठी ‘लोकमत’च्या वतीने धनादेश देताना ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा. यावेळी जल शक्ती मंत्रालयाच्या सचिव देबश्री मुखर्जी (जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण), संयुक्त सचिव पी. के. अग्रवाल, पूर व्यवस्थापन आयुक्त शरदचंद्र, कार्यकारी संचालक बिजेंद्र स्वरूप, ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरिश गुप्ता आणि प्रवीण भागवत उपस्थित होते. 

टॅग्स :riverनदीLokmatलोकमत