शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Lokmat Parliamentary Awards: शिवसेना गद्दार, युतीचा धर्म पाळला नाही- पीयूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 17:42 IST

Lokmat Parliamentary Awards 2019 : भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही.

नवी दिल्लीः भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. देशानं 1990-2000मध्ये राजकीय अस्थिरता पाहिली आहे. प्रादेशिक पक्ष हे देशाच्या राजकारणासाठी योग्य नाहीत. प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो, असा आरोपही पीयूष गोयल यांनी केला आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणावरही भाष्य केलं आहे. आम्ही युती म्हणून लढलेल्या 288पैकी 164 जागा जिंकलो. भाजपानं 105 जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्रात आम्हीयाचा अर्थ आम्ही लढवलेल्या 65 ते 70 टक्के जागा जिंकल्या. पण शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली. युतीचा धर्म पाळला नाही. जर भाजपानं महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवल्या असत्या तर आमचं सरकार नक्कीच आलं असतं. शिवसेना शत्रूच्या गोटात जाऊन सामील झाली. शिवसेनेनं सर्वच सिद्धांत मोडीत काढले आहेत. शिवसेना कालपर्यंत ज्यांच्यावर टीका करत होती, त्यांच्यासोबतच जाऊन बसली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला कोणतीही दूरदृष्टी किंवा ध्येयधोरणं नाहीत. त्यामुळे देशाला या सरकारनं नुकसानच होणार आहे. महाराष्ट्रात भाजपालाच विजय मिळालेला आहे, इतर तिन्ही पक्षांचा पराभव झालेला आहे. शिवसेनेच्या अरविंद सावंतांसाठी मी गल्लीबोळात जाऊन प्रचार केला होता, दक्षिण मुंबईतली जनता शिवसेनेला मतं देऊ इच्छित नव्हती. आम्हाला त्यावेळी माहिती नव्हतं की, हे लोक गद्दारी करतील. शिवसेनेनं आपल्या सिद्धांतांशी फारकत घेत महाराष्ट्रात सरकार बनवलं. आता ते स्वतःला हिंदू सम्राट म्हणायलाही घाबरतात, असंही पीयूष गोयल यांनी अधोरेखित केलं आहे.   

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019piyush goyalपीयुष गोयलShiv Senaशिवसेना