शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Awards 2018: सेनेचे तुम्हाला दिसणारे 'तेवर' वेगळे, युती होणारच!- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 17:22 IST

या 'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह'मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी घेतली

ठळक मुद्दे'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह'मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलासपणे भाष्य केलं आहे.फॉर्म्युल्यांच्या आधारावर भाजपाची शिवसेनेशी युती होणारच

नवी दिल्लीः राजधानी दिल्लीत लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड 2018च्या पार्श्वभूमीवर 'राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान' या विषयावर ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’ला सुरुवात झाली आहे. या 'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह'मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलासपणे भाष्य केलं आहे.भाजपा हा पक्ष फक्त दोन व्यक्ती चालवत असल्याचं उद्धव ठाकरेंना वाटतं, असा प्रश्न रजत शर्मा यांनी विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिलं. भाजपा या पक्षाचा कुणीही मालक नाही. हा कुठल्याही परिवाराचा पक्ष नाही. सामान्य कार्यकर्ताही इथे नेता होऊ शकतो. माझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री बनू शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. सामनातून सातत्यानं भाजपावर टीका करण्यात येते, तुम्ही सामना वाचल्यास शिवसेनेची युती करावीशी वाटणार नाही. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मी सामना वाचतच नाही. शिवसेना आमच्यासोबतच राहील. तुम्हाला शिवसेनेचे जे 'तेवर' दिसतात, त्यापेक्षा वेगळे 'तेवर' आम्हाला माहीत आहेत. काही फॉर्म्युल्यांच्या आधारावर भाजपाची शिवसेनेशी युती होणारच, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

या मुलाखतीचे लाइव्ह अपडेट्स

>> काही फॉर्म्युले तयार केलेत; शिवसेनेशी युती होणारच

>> राज ठाकरे माझे मित्र. मतं मांडतात, पण त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही. तुम्हीही गंभीरपणे घेऊ नका. 

>> राहुल गांधींचं अभिनंदन. राजस्थान, मध्य प्रदेशात जी मतं मिळाली, ती पाहता मोठा पराभव नाही. आत्मपरीक्षण नक्कीच करू. 

>> एकाच व्यक्तीवर टीका करू नये, हे शरद पवारांना १९९९ मध्ये लक्षात आलं असतं तर राष्ट्रवादी पक्षाची स्थापनाच झाली नसती. 

>> अहंकार हे पराभवाचं कारण नाही. आम्ही जमिनीशी जोडलेली माणसं. 

>>भाजपाचा कुणीही मालक नाही. ही कुठल्याही परिवाराची गोष्ट नाही. माझ्यासारखा माणूस इथे मुख्यमंत्री बनू शकतो.

>>काँग्रेसमुक्त भारत याचा अर्थ एखाद्या पक्षापासून मुक्ती नाही, तर काँग्रेसने निर्माण केलेल्या प्रवृत्तीपासून मुक्तता देणं.

>> तीन राज्यं भाजपामुक्त कशी म्हणता येतील? राजकारणात कुणी कुणाला समाप्त करू शकत नाही, जनताच समाप्त करू शकतं. 

>> पराभव झाला हे मान्यच. पण, राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सरकारं बदलतातच. पण, यावेळी भाजपा आणि काँग्रेसमध्ये फक्त ०.५ टक्के मतांचा फरक. जो जिता वही सिकंदर, पण त्यामुळे भाजपाला नाकारलं असं म्हणता येणार नाही.

>> देशात सक्षम विरोधी पक्ष असणं चांगलं. राहुल गांधींना आणखी पाच-दहा वर्षं विरोधकांचं नेतृत्व करायचं आहे. त्यामुळे ते जितकं चांगलं लीड करताहेत, ते चांगलंच.

>> शिवसेना आमच्यासोबतच राहील. तुम्हाला जे 'तेवर' दिसतात, त्यापेक्षा वेगळे 'तेवर' आम्हाला माहीत आहेत.  

>> रामाच्या नावावर राजकारणाचा प्रश्नच नाही. हल्ली राहुल गांधी खूप देवळात जाताहेत. त्यांनी मदत केली तर राम मंदिराचा कायदाही बनू शकतो.  

>> नोटाबंदी, जीएसटीनंतर ११ राज्यांत भाजपा जिंकली, हे तुम्ही पाहात नाही. एक निवडणूक हरली तर तुम्ही असा गोंधळ करता की आम्ही पुन्हा निवडूनच येणार नाही. पण २०१९ मध्ये पुन्हा मोदीच निवडून येणार. हा अतिआत्मविश्वास नाही, आत्मविश्वास. 

>> महाआघाडी बनो, न बनो... जनतेला नरेंद्र मोदींचंच नेतृत्व हवंय.  

>> मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. मुद्रामुळे अनेकांना कर्ज मिळाली, त्यांना रोजगार मिळालाच की.

>> चार वर्षांत प्रत्येक प्रश्न संपेल असं नाही. मोदींनी चार वर्षांत पटरीवरून उतरलेली गाडी पटरीवर आणली आहे, आता ती वेगाने पुढे जाईल. 

टॅग्स :Lokmat Parliamentary Awards 2018लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस