शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Awards 2018 Live: सत्ता स्थापनेसाठी वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊ शकतात- ओमर अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 15:32 IST

राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान’ या विषयावर ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’ला सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड 2018च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान’ या विषयावर ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’ला सुरुवात झाली आहे. दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेल्या या कॉन्क्लेव्हमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सहभागी झाले आहेत. मोदी आणि शहांच्या हातात जादूची छडी होती, असंच काहीतरी बोललं जात होतं. तसं चित्र राहिलेलं नाही. हे दोघं असतानाही भाजपा हरू शकते आणि राहुल गांधी काँग्रेसला जिंकवू शकतात, हे आता सिद्ध झालं आहे, असंही ते म्हणाले आहेत. राहुल गांधींमुळेच तीन राज्यांत काँग्रेसला मोठा विजय मिळाल्याचं ते म्हणाले आहेत. मीडियावाले काँग्रेसच्या पराभवाचं खापर जर राहुल गांधींवर फोडत असतील, तर विजयाचं श्रेयही त्यांना दिलंच पाहिजे, असंही ओमर अब्दुल्लांनी स्पष्ट केलं आहे. 

>>देशातील प्रत्येक राज्यांत प्रादेशिक पक्षांची ताकद नाही. ज्या तीन राज्यांत काँग्रेस जिंकली, तिथे प्रादेशिक पक्ष नव्हतेच. परंतु, तेलंगणात प्रादेशिक पक्षानं मोठं यश मिळवलं. प्रादेशिक पक्षांचं महत्त्व कमी झालंय, असं म्हणता येणार नाहीच. भाजपानंही अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांची मदत घेऊन सरकारं स्थापन केल्याचं पाहायला मिळतंय. येत्या लोकसभा निवडणुकीतही प्रादेशिक पक्षांची भूमिका मोठी असेल.

>>पराभव होत होता तेव्हा राहुल गांधींवर टीका होत होती. आता जिंकलेत, तर विजयाचं श्रेय राहुल गांधींना द्यावंच लागेल. इतके दिवस भाजपाला मिळालेल्या विजयाचं श्रेय मोदींना दिलं, मग पराभवाची जबाबदारीही त्यांचीच. 

>> मोदी आणि शहांच्या हातात जादूची छडी होती, असंच काहीतरी बोललं जात होतं. तसं चित्र राहिलेलं नाही. हे दोघं असतानाही भाजपा हरू शकते आणि राहुल गांधी काँग्रेसला जिंकवू शकतात, हे आता सिद्ध झालं आहे.

>>राजकीय पक्षांची विचारधारा सारखी नसली तरी सत्तेसाठी वेगवेगळ्या विचारधारेचे दोन पक्षही एकत्र येतात. राज्यपाल कोणाचीही विचारधारा निश्चित करू शकत नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजपा, बिहारमध्ये नितीश-लालू एकत्र आलेच होते. सत्ता स्थापनेसाठी वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊ शकतात. 

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या मुलाखतीची विशेष जबाबदारी पत्रकार रजत शर्मा आणि बरखा दत्त सांभाळणार आहेत. या कॉन्क्लेव्हमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या मुलाखतीपासून सुरुवात झाली आहे.

टॅग्स :Lokmat Parliamentary Awards 2018लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८