शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

भयावह कोरोना! देशभरात कहर सुरु; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 15:04 IST

Corona Virus second wave: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,846 नवीन रुग्ण सापडले आहेत. यापैकी जवळपास 27 हजार रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

देशात कोरोनाची दुसरी मोठी लाट सुरु झाली असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,846 नवीन रुग्ण सापडले आहेत. यापैकी जवळपास 27 हजार रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,15,99,130 झाली आहे. ("Om Birla was admitted to AIIMS COVID Centre for observation on March 20. He is stable and his parameters are normal," a release by AIIMS read.)

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सलग ११ व्या दिवशी वाढून 3,09,087 एवढी झाली आहे. तर बरे होण्याचा दर घसरून 95.96 राहिला आहे. 

राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट 19 मार्चला पॉझिटिव्ह आला असून 30 मार्चला त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालय़ात दाखल करण्यात आले आहे. एम्सने बुलेटीन काढून बिर्ला यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सने म्हटले आहे. 

दैनंदिन रुग्णसंख्येचा राज्यात पुन्हा उच्चांक; मुंबईत दिवसभरात २९६२ रुग्णराज्यात सलग दोन दिवस काेराेनाची दैनंदिन रुग्णसंख्या २५ हजारांहून अधिक असल्याची नोंद झाल्याने चिंतेचे वातावरण होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. दिवसभरात २७ हजार १२६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ९२ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील उपचाराधीन रुग्णांची  संख्या १ लाख ९१ हजार ६ इतकी झाली आहे. राज्यात लॉकडाऊन होऊन वर्षपूर्ती होत असताना कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. दरम्यान, मुंबईत शनिवारी २,९६२ रुग्णांची नाेंद झाली असून, ७ मृत्यू झाले. 

राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २४,४९,१४७  झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ३०० आहे. शनिवारी दिवसभरात १३,५८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत एकूण २२,०३,५५३  बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९७ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ टक्के एवढा आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.४४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,१८,४०८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ७,९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

टॅग्स :om birlaओम बिर्लाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस