शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

"कशावर आक्षेप असावा, कशावर नसावा...? सल्ला देऊ नका, चला बसा..."; ओम बिरला यांनी कुणाला फटकारलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 18:36 IST

केरळच्या तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते शशी थरूर खासदारकीची शपथ घेऊन परतताना हा संपूर्ण प्रकार घडला.

लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे पहिले अधिवेशन सुरू आहे. या पहिल्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर, सभापती ओम बिर्लाकाँग्रेस खासदार दीपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर जबरदस्त भडकले. केरळच्या तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते शशी थरूर खासदारकीची शपथ घेऊन परतताना हा संपूर्ण प्रकार घडला.

नेमकं काय घडलं? -घडले असे की, संसदेच्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर, जय संविधान, अशी घोषणा दिली. यानंतर थरूर सभापती ओम बिर्ला यांच्यासोबत हस्तांदोलन करून आपल्या जागेवर परतत होते. तेवढ्यात सभापतींनी त्यांना हटकले आणि म्हणाले, संविधानाची शपथ तर घेतच आहात, ही संविधानाचीच शपथ आहे. सभापतींच्या या वक्तव्यावर काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा उभे राहिले आणि म्हणाले, यावर आपण आक्षेप घ्यायला नको होता सर...

यावर सभापती ओम बिरला हुड्डांवर भडकले आणि म्हणाले, "कशावर आक्षेप असावा आणि कशावर नसावा, सल्ला देत जाऊ नका. चला बसा." आता यावर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनीही आक्षेप घेत एक्सवर पोस्ट केली आहे. प्रियांका यांनी एक्सवर पोस्ट करत, भारताच्या संसदेत 'जय संविधान' म्हणता येत नाही? असा सवाल केला. सभापतींच्या आक्षेपावर नाराजी व्यक्त करत, संसदेत सत्ताधारी पक्षाच्या लोकांना असंसदीय आणि असंवैधानिक घोषणा देतांना रोकले गेले नाही. मात्र, विरोध पक्षाच्या खाजदाराने 'जय संविधान' म्हटले म्हणून आक्षेप घेण्यात आला.

टॅग्स :om birlaओम बिर्लाParliamentसंसदShashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस