शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
5
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
6
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
7
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
8
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
9
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
10
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
11
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
12
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
13
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
14
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
15
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
16
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
17
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
18
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
19
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
20
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव

MA, M.Ed, M.Phil अन् NET उत्तीर्ण; संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या नीलमचा भाऊ म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 19:10 IST

Parliament Winter Session 2023: संसदेबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी करणाऱ्या नीलमला पोलिसांनी अटक केली असून, कसून तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Parliament Winter Session 2023: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. या दोघांनी सभागृहातील बेंचवर उड्या मारून गोंधळ घातला. सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. याप्रकरणी चार जणांना पकडण्यात आले असून, अधिक तपास सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे. या घटनेवेळी संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या नीलमच्या भावाने तिच्याविषयी माहिती देताना, ती उच्चशिक्षित असल्याचे सांगितले.

नहीं चलेगी नहीं चलेगी.. तानाशाही नहीं चलेगी... अशी घोषणाबाजी करत संसद सभागृहात आणि संसदेच्या बाहेरही युवकांनी आपला रोष व्यक्त केल्याचे दिसून आले. सन २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाला होता. या घटनेला २२ वर्ष झाली असून, यानिमित्ताने शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. याच दिवशी सुरक्षेत एवढी मोठी चूक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संसदेत हा प्रकार घडल्यावर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. यात सामील असलेल्या नीलम हिच्या भावाला याबाबत विचारणा करण्यात आली. 

आम्हाला माहितीच नाही की ती दिल्लीत गेली आहे

नीलम हिचा भाऊ रामनरेश यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. नीलम माझी मोठी बहीण आहे. ती दिल्लीला गेल्याचे आम्हाला माहिती नव्हते. आम्हाला एवढेच माहिती होते की आम्ही तिला हिसार येथे अभ्यासासाठी पाठवले आहे. ती परवा आली होती आणि काल परत गेली. ती BA, MA, B.Ed, M.Ed, CTET, M.Phil आणि NET पात्र आहे. ती उच्चशिक्षित आहे. बेरोजगारीचा मुद्दा तिने अनेकदा मांडला आहे. शेतकरी आंदोलनात ती सहभागी झाली होती. ते तिचे पहिले आंदोलन होते. या कारणास्तव आम्ही त्याला हिसार येथे पाठवले होते. या घटनेला ६ महिने झाले आहेत. वडिलांचे मिठाईचे दुकान आहे. माझा भाऊ आणि मी दुधाचा व्यवसाय करतो. तिने हे चांगले केले की चुकीचे ते आम्हाला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया भावाने दिली.

दरम्यान, नीलमची आई सरस्वती यांनी सांगितले की, ती बेरोजगारीमुळे खूप चिंतेत होती. आम्ही त्याच्याशी बोललो पण तिने आम्हाला दिल्लीबद्दल काहीही सांगितले नाही. ती मला सांगायची की ती खूप शिकलेली आहे पण तरीही तिला नोकरी नाही. आम्ही गरीब लोक आहोत आणि कसेबसे जीवन जगत आहोत, असे सरस्वती यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभा