शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 18:39 IST

Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. 4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. उद्या, म्हणजेच 4 जून रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल आणि सायंकाळपर्यंत देशभरातील सर्व निकाल लागतील. या निकालांवर देशासह जगभरातील अनेक देशांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतांची मोजणी कशी केली जाते ? मतमोजणीच्या दिवशी नेमके काय होते? कोण मते मोजतो? मतमोजणीनंतर EVM चे काय होते? अशी अनेक प्रश्ने तुमच्या मनात आली असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत.

मतमोजणीला किती वाजता सुरुवात होणार?निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आधी पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाईल आणि नंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाईल. पोस्टल मतपत्रिकेतही दोन गटात मतमोजणी होणार आहे. पहिल्यांदा लष्कर, निमलष्करी दलातील जवानांची मते मोजली जातील आणि नंतर निवडणूक कर्तव्य बजावणारे कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पोस्टल मतांची मोजणी होईल.

पोस्टल मतपत्रिकांची मोजणी कोण सुरू करते?निवडणूक नियम 1961 च्या नियम 54A अंतर्गत पोस्टल मतपत्रिकांची मोजणी रिटर्निंग ऑफिसर (RO) यांच्या टेबलावर सुरू होईल. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू झाल्यानंतर 30 मिनिटांनी ईव्हीएममधून मतमोजणी सुरू होते.

मतमोजणी अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत?मतदारसंघात पोस्टल मतपत्रिका नसल्यास ईव्हीएमवरुन मतमोजणी निर्धारित वेळेत सुरू करता येईल. मतमोजणीसाठी मतदान केंद्रात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमच्या कंट्रोल युनिट (CU) सोबत फक्त फॉर्म 17C आवश्यक आहे. EVM च्या CU मधून निकाल जाणून घेण्यापूर्वी मतमोजणी अधिकारी त्यांच्या कागदावरील शिक्के तपासतो आणि एकूण मतदान फॉर्म 17C मध्ये नमूद केलेल्या मतांशी जुळत असल्याची खात्री करतो.

निकाल कसा जाहीर होतो?कंट्रोल युनिटचा निकाल मतमोजणी निरीक्षक, सूक्ष्म निरीक्षक आणि उमेदवारांच्या मोजणी प्रतिनिधींना दाखवल्यानंतर फॉर्म 17C च्या भाग-II मध्ये नोंदवला जातो. कंट्रोल युनिटच्या डिस्प्ले पॅनलमध्ये निकाल प्रदर्शित न झाल्यास सर्व CUs ची मोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित VVPAT स्लिप्स मोजल्या जातात. प्रत्येक CU चा उमेदवारनिहाय निकाल फॉर्म 17C च्या भाग II मध्ये नोंदवला जातो आणि मतमोजणी निरीक्षक आणि मतमोजणी टेबलावर उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधींची स्वाक्षरी केली जाते.

VVPAT स्लिप्स कधी मोजल्या जातात?CU मधून मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच VVPAT स्लिपची मोजणी सुरू होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ/लोकसभा मतदारसंघातील निवडलेल्या पाच मतदान केंद्रांच्या VVPAT स्लिपची अनिवार्य पडताळणी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच केली जाते. जेव्हा विजयाचे अंतर रद्द केलेल्या पोस्टल मतपत्रिकांच्या संख्येपेक्षा कमी असेल, तेव्हा अशा सर्व नाकारलेल्या पोस्टल मतपत्रिकांची पुन्हा पडताळणी केली जाते. विशेष म्हणजे, दोन उमेदवारांना समान संख्येने सर्वाधिक मते मिळाल्यास, निकाल लॉटरीद्वारे घोषित केला जातो.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग