शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! लोकसभेत सवर्ण आरक्षण विधेयक मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 22:29 IST

विधेयकाच्या बाजूनं 323 सदस्यांचं मतदान

नवी दिल्ली: लोकसभेत सवर्ण आरक्षण विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूनं 323 सदस्यांनी मतदान केलं. तर या विधेयकाच्या विरोधात अवघ्या 3 जणांनी मतदान केलं. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी याबद्दलचं विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं. यावर संध्याकाळी पाच वाजल्यापासून सभागृहात चर्चा सुरू होती. रात्री 10 वाजता यावर मतदान घेण्यात आलं. त्यात हे विधेयक बहुमतानं मंजूर झालं. (सविस्तर वृत्त लवकरच)गरीब सवर्णांना आरक्षण देण्यासाठी सरकारनं लोकसभेत मांडलेल्या विधेयकावर जवळपास पाच तास चर्चा झाली. या विधेयकाला जवळपास सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. कोणत्याही पक्षानं या विधेयकाला थेट विरोध केला नाही. मात्र अनेक खासदारांनी या आरक्षणाबद्दलच्या सरकारच्या हेतूंवर शंका घेतली. हे विधेयक तांत्रिक निकषांवर टिकमार नाही, असा अंदाज अनेक खासदारांनी व्यक्त केला. तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी हे विधेयक घटनाविरोधी असल्याचं म्हटलं. लोकसभेत हे विधेयक मंजूर होऊ शकेल. त्यामुळे ही काही होळी, दिवाळी साजरी करायची आहे ती करून घ्या. मात्र हे विधेयक न्यायालयात टिकणार नाही, असं ओवैसीनं म्हटलं. विरोधकांनी नोंदवलेल्या आक्षेपाला सरकारकडून अर्थमंत्री अरुण जेटलींनी उत्तर दिलं. घटनेनं आरक्षणाची मर्यादा 50 टक्के इतकी ठेवली आहे. मात्र ती सामाजिकदृष्ट्या असलेल्या मागास असलेल्या जातींसाठी आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी ही मर्यादा नाही. सामाजिक आणि आर्थिक भेदभाव संपवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचं जेटली म्हणाले. आज प्रत्येक नागरिकाला समान संधी देण्याची आवश्यकता आहे. आर्थिक आधारावरील आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असू शकतं. कारण ते जातीवर आधारित नाही, असंही ते पुढे म्हणाले.