शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

भाजपला दुसरा झटका; गुजरातच्या दिग्गज नेत्याचा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 18:57 IST

Lok Sabha Elections: पवन सिंहनंतर आता गुजरातच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

Gujarat Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी(दि.2) 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पण, यादी आल्यानंतर चोवीस तासांच्या आत पक्षाला दोन झटके बसले आहेत. आधी भोजपुरी स्टार पवन सिंह यांनी पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला, त्यानंतर आता गुजरातमधील दिग्गज नेत्यानेही निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. 

भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत भाजपच्या 195 उमेदवारांची घोषणा केली. यात गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना मेहसाणा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पण, आता त्यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली आहे. नितीन पटेल यांनी फेसबुक पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उमेदवारी मागे घेण्याचे कारण दिले नाही, पण नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी देवाला प्रार्थना केली. तसेच, सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे आभारही मानले. 

कोण आहेत नितीन पटेल?नितीन पटेल भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. पटेल यांनी 2021 मध्ये मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी गुजरातच्या अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केले आहे.

भाजपने दिले लोकसभेचे तिकीट; आता अचानक पवन सिंह यांचा निवडणूक लढवण्यास नकार

भाजपला दोन धक्केदरम्यान, भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहला भाजपने पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उमेदवारी जाहीर केली होती. याबाबत त्याने पक्षाचे आभारही मानले. पण, आज अचानक पवन सिंहने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. याबाबत पवन सिंहकडून अधिकृत कारण देण्यात आले नाही. आता नितीन पटेल यांनीही निवडणूक न लडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला या दोन्ही ठिकाणांसाठी नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत.

 

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरातlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण