शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

15 करोड द्या, तिकीट घ्या हेच मायावतीचे राजकारण - मेनका गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 09:07 IST

बसपा नेत्या मायावती उमेदवारीचे तिकीट विकतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या पक्षाने नेते अभिमानाने हे सांगतात

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी बुधवारी बहुजन समाज पार्टीच्या नेत्या यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. मायावती या करोडो रुपयांना लोकसभा उमेदवारीचे तिकीट विकतात असा गंभीर आरोप मेनका गांधी यांनी केला. सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून मेनका गांधी भाजपाच्या उमेदवार आहेत. बुधवारी सुलतानपूर येथे आयोजित केलेल्या सभेत बोलताना मेनका गांधी यांनी हा आरोप केला. 

यावेळी बोलताना मेनका गांधी म्हणाल्या की, बसपा नेत्या मायावती उमेदवारीचे तिकीट विकतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या पक्षाने नेते अभिमानाने हे सांगतात. मायावती यांचे 77 घरं आहेत, मायावती यांच्या पक्षाचे नेतेच सांगतात, आमच्या नेत्या मायावती हिरे नाही तर पैसे घेते. 15 करोड रुपयांना उमेदवारीचे तिकीट दिले जाते असा आरोप मेनका गांधी यांनी केला. 

बसपामध्ये कोणालाही तिकीट मोफत दिले जात नाही. 15 करोड रुपये देऊन उमेदवारी घ्यावी लागते मग सपा-बसपा आघाडीचे उमेदवार चंद्रभद्र सिंह उर्फ सोनू यांच्याकडे हे पैसे आले कुठून? असा सवाल मेनका गांधी यांनी उपस्थितांना केला. तसेच हे 15 करोड रुपये तुमच्या खिशातून काढून दिल्याची टीकाही मेनका गांधी यांनी विरोधी उमेदवार चंद्रभद्र सिंह यांच्यावर केली.

उत्तर प्रदेशात लोकसभा मतदारसंघाच्या 80 जागा आहेत. मागील निवडणुकीत भाजपाला 70 हून अधिक जागांवर विजय मिळाला होता. मात्र यंदाची निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या कट्टर विरोधकांनी एकत्र येत भारतीय जनता पार्टीला आव्हान दिले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकManeka Gandhiमनेका गांधीmayawatiमायावतीsultanpur-pcसुल्तानपुर