शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 15:36 IST

Yogi Adityanath In West Bengal: 'पश्चिम बंगालमध्ये हिंदू संस्कृती पायदळी तुडवण्याचे प्रयत्न.'

Yogi Adityanath West Bengal Visit : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सर्व प्रमुख नेते देशभरात प्रचारसभा घेत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालच्या बहरामपूरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केला. पश्चिम बंगालचे दंगलखोर उत्तर प्रदेशात असते, तर त्यांना उलटं टांगून असा धडा शिकवला असता, जो त्यांच्या सात पिढ्या विसरू शकले नसते, असे योगी म्हणाले.

पश्चिम बंगाल सरकारने दंगलखोरांवर कारवाई का केली नाही? आज बंगालमध्ये रक्तपात होतोय होत आणि सरकार दिशाहीन आहे. ज्या बंगालने देशाला राष्ट्रगीत दिले, ज्या बंगालने आपल्याला गर्वाने हिंदू म्हणायला शिकवले, त्याच बंगालमध्ये हिंदू संस्कृती पायदळी तुडवण्याचे कसे प्रयत्न केले जाताहेत. संदेशखलीसारख्या घटना बंगालमध्ये कशा घडतात, हा प्रश्न मी बंगाल सरकारला विचारण्यासाठी आलोय. आजचा बंगाल हा सोनार बांगला नाही, ज्याची कल्पना स्वातंत्र्यसैनिकांनी केली होती. बंगालला दंगलीच्या आगीत ढकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बंगाल एका षड्यंत्राचा बळी ठरत आहे, अशी टीकाही योगी आदित्यनाथ यांनी केली.

'यूपीमध्ये 7 वर्षांत एकही दंगल नाही'योगी पुढे म्हणाले, काँग्रेस आणि टीएमसी एकाच नाण्याच्या दोन बाजू नआहेत. दोन्ही पक्ष बंगालला लुटण्यात एकवटले आहेत. बंगालमध्ये आज रक्तपात होतोय. सात वर्षांपूर्वी यूपीचीही अशीच स्थिती होती. आज तुम्ही युपीत पाहा, गेल्या सात वर्षांत एकदाही दंगल घडली नाही, कर्फ्यू लागला नाही. ज्या बंगालमधून स्वामी विवेकानंदांनी 'गर्वाने बोला आम्ही हिंदू आहोत' असा संदेश दिला, आज त्याच बंगालमध्ये हिंदूंना हद्दपार करण्याचे षडयंत्र सुरू आहे.

यूपीमध्येही नवरात्रीच्या निमित्ताने माँ दुर्गेची पूजा केली जाते, मोठमोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, पण कधीच रामनवमी आणि नवरात्रीला दंगल होत नाही. मात्र, पश्चिम बंगालमध्ये बैसाखी आणि रामनवमीसारख्या सणांच्या दिवशी दंगली का होतात?, असा प्रश्नही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीविचारला.

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४yogi adityanathयोगी आदित्यनाथ