शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Elections 2024 : आता घरबसल्याही 'या' लोकांना करता येणार मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 17:46 IST

Lok Sabha Elections 2024 : देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार असून चार जूनला निकाल जाहीर होणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणूक जाहीर केली असून आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार असून चार जूनला निकाल जाहीर होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, संपूर्ण देशात प्रथमच 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदार घरबसल्या मतदान करू शकणार आहेत. 

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, यावेळी संपूर्ण देशात प्रथमच अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या किंवा 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या मतदारांना फॉर्म 12 डी वितरित केला जाईल. त्यांना मतदान केंद्रावर जायचं नसेल तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचं मत नोंदवलं जाईल. यासाठी आम्ही निवडणूक कर्तव्यात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, अधिसूचना जारी केल्यापासून पाच दिवसांच्या आत, संबंधित क्षेत्रातील BLO मतदारांच्या घरोघरी जाऊन फॉर्म 12-D भरून जमा करतील. यामध्ये फॉर्म भरायचा की नाही हा मतदाराचा निर्णय आहे. तो मतदान केंद्रावर जाऊन मतदानही करू शकतो. अधिकाधिक वृद्ध आणि दिव्यांग लोकांना मतदान करावं हा त्या मागचा उद्देश आहे.

यापूर्वी, सरकारने 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी निवडणूक नियमांमध्ये सुधारणा केली होती. आतापर्यंत 80 वर्षांवरील व्यक्ती या सुविधेचा लाभ घेऊ शकत होत्या.  मतदारांची माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, देशात एकूण मतदारांची संख्या 96.8 कोटी आहे. त्यापैकी 49.7 कोटी पुरुष आणि 47 कोटी महिला आहेत. यावेळी 1.82कोटी मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. 12 राज्यांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानElectionनिवडणूक